मुंबई: वन प्लसनं २०१४मध्ये लॉन्च केलेल्या स्मार्टफोनचं नाव 'वन प्लस वन' होतं. त्यानुसार मानलं जात आहे की, १ जूनला लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनचं नाव 'वन प्लस टू' असू शकतं. मात्र कंपनीनं कोणत्याही नावाचा खुलासा केलेला नाही.
कंपनीनं हा फोन लॉन्च करण्याआधी त्याचं टीझर प्रसारित केलं आहे. या टीझरमध्ये फोनला 'टाईम टू चेंज' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. मोबाईल बाजारात कंपनीनं त्यांची खास जागा बनवली आहे. १ जुनला लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये चांगले फीचर असतील आणि किंमतही खिशाला परवडेल अशी असणार आहे.
'वन प्लस टू'चे फीचर असे असू शकतात-
- क्वाल कॉम स्नॅप ड्रॅगन 810 (Qualcomm Snapdragon 810) प्रोसेसर
- 64 bit 8 कोर (ऑक्टाकोर) प्रोसेसर
- अॅंड्रॉइड लॉलीपॉप
- 3 जीबी RAM
- फुल HD डिस्प्ले
- 5 MP फ्रंट कॅमेरा
- 13 MP रिअर कॅमेरा
- 3300 mAH बॅटरी
- 4G LET,
- GPS, Bluetooth, Wi-Fi
- Micro-USB.
या फोनची किंमत ३० हजारांपर्यंत असू शकते
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.