कॅलिफोर्निया : वेळ मिळाल्यावर किंवा वेळ काढून मोबाईलवर गेम खेळणे आजच्या तरूणाईच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेला गेम 'कॅण्डी क्रश सागा' आहे. मात्र याच गेममुळे एका २९ वर्षीय तरूणाला आपल्या अंगठ्याची पेशी तुटल्याने अंगठ्यालर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
कॅलिफोर्नियातील एका तरूणाला कॅण्डी क्रश खेळण्याची सवय लागली होती. सतत गेम खेळल्याने त्याचा अंगठा काही दिवसांनी काम सुन्न झाला. तो उपचारासाठी डॉक्टरांकडे गेल्यानंतर अंगठ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
संशोधकांच्या मते गेम खेळणे एखाद्या व्यसनाप्रमाणे असते. त्यामध्ये आपण एवढे व्यस्त होतो की दुखनं विसरून जातो. डॉक्टरांच्या मते अर्ध्या तासापेक्षा जास्तवेळ स्मार्टफोनवर गेम्स खेळणं हे हानिकारक ठरु शकतं.
भारतात देखील अशा गेम्सची लोकप्रियता फार आहे. त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी शक्यतो जास्त वेळ गेम खेळणे टाळावे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.