मुंबई : नवीन फोन घ्यायचा म्हटलं की जुन्या फोनचं काय करावं हा प्रश्न असतोच. काही जण त्याचा वापर डेटा ठेवायला वापरतात. तर काही GPS वापरण्यासाठी वापरतात.
पण तुम्हाला जर तो फोन टाकून द्यायचा असेल तर मात्र त्यातला सर्व डेटा काढून घ्यायला विसरू नका. कारण हा खाजगी डेटा कोणाच्या हाती पडणे धोक्याचे ठरू शकते.
त्यासाठी डेटा 'एन्स्क्रिप्ट' करा म्हणजे तुमचे पासवर्ड कोणाला मिळणार नाहीत. ते करण्यासाठी फोनच्या सिक्युरिटी सेटींगमध्ये जा आणि एन्स्क्रिप्शन पर्याय निवडा.
डेटा मोठ्या साईजचा असेल तर फोन चार्जिंगला लावून ठेवा. कारण यासाठी खूप वेळ लागू शकतो. तेव्हा मोबाईल बंद पडू नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक आहे. हे सर्व झाल्यावर फोनला फॅक्टरी रिसेट करा.