मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शहरात कामाला आलेली शेतकऱ्यांची मुलं एकवटली आहेत. ट्ववीटरवर आज सायंकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत, रावसाहेब दानवे यांच्याविरोधात #सालादानवे ही हॅशटॅग मोहिम चालवण्यात येत आहे. (वरील फोटो हा हॅशटॅग मोहिममध्ये व्हायरल होतोय, हा फोटो झी २४ तासचा नाही)
असभ्य भाषेत रावसाहबे दानवे यांनी म्हटले आहे, 'आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त तूर आपल्या सरकारने खरेदी केली, अजून एक लाख टन तूर खरेदी करणार आहे तरी रडतात साले'. यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे, विरोधी पक्षांकडून दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
दानवे यांच्या वक्तव्याविरोधात टवीटरवर #सालादानवे असं लिहून आपली मतं नेटीझन्स व्यक्त करणार आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. म्हणून ही मोहिम काँग्रेसने उघडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज सायंकाळी ६ ते ९ या काळात #सालादानवे या शब्दाने हॅशटॅगने टवीट करण्याचं प्रमाण वाढलं, तर हा हॅशटॅग ट्रेन्डमध्ये येऊ शकतो.