सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ ऑक्टोबरमध्ये भारतात होणार लॉन्च

भारतात फोन ग्राहकांची नेहमी एक तक्रार असते, ती म्हणजे कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर अनेक दिवसांनी तो भारतात उपलब्ध होतो. सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ आपली ही तक्रार दूर करणार आहे. कारण भारतातील रिटेल स्टोअर्समध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच नोट ४ लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Sep 21, 2014, 09:43 AM IST
सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ ऑक्टोबरमध्ये भारतात होणार लॉन्च   title=

नवी दिल्ली: भारतात फोन ग्राहकांची नेहमी एक तक्रार असते, ती म्हणजे कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर अनेक दिवसांनी तो भारतात उपलब्ध होतो. सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ आपली ही तक्रार दूर करणार आहे. कारण भारतातील रिटेल स्टोअर्समध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच नोट ४ लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. 

चौथ्या पिढीचं हे डिव्हाइस अमेरिकेत १७ ऑक्टोबर आणि ब्रिटनमध्ये १० ऑक्टोबरला लॉन्च होईल. भारतात हा फोन सर्वात पहिले लॉन्च केला जाणार आहे.  

गॅलेक्सी नोट ४ दिवाळीपूर्वीच भारतीय बाजारात उपलब्ध असेल. सणासुदीच्या दिवसांत संपूर्ण नफा कमावण्याचा कंपनीचा मानस आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ५.७ इंच स्क्रीन असेल. यात दोन प्रोसेसर लावलेत, १ स्नॅपड्रॅगन २.७ GHz क्वाड कोर प्रोसेसर आणि दुसरं १.९GHz प्रोसेसर. 

भारतात इक्सनोस प्रोसेसरसह हा फोन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सोबतच या फोनमध्ये आपल्याला १६ मेगापिक्सेल कॅमेरा आणि ३.७ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध होईल. हा फोन ऑनलाइन उपलब्ध नसेल. रिटेल आणि किरकोळ दुकानदारांचं ऑनलाइन मार्केटमुळं होणाऱ्या नुकसानानंतर सॅमसंगनं ऑनलाइन फोन विक्रीवर बंदी घातलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.