स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी या सोप्या टिप्स

स्मार्टफोन आपल्या जीवनातील मूलभूत गरज बनलीये. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजांसोबत स्मार्टफोन ही माणासाची चौथी गरज बनलीये. 

Updated: Mar 9, 2017, 01:02 PM IST
स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी या सोप्या टिप्स title=

मुंबई : स्मार्टफोन आपल्या जीवनातील मूलभूत गरज बनलीये. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजांसोबत स्मार्टफोन ही माणासाची चौथी गरज बनलीये. 

मात्र स्मार्टफोन वापरताना नेहमी समस्या सतावते ती स्मार्टफोनच्या चार्जिंगची. तुमच्याही स्मार्टफोनची चार्जिंग पटकन संपते तर या आहेत काही टिप्स ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची चार्जिंग पटकन उतरणार नाही. 

तुमच्या फोनची बॅटरी पूर्णपणे उतरलीये आणि तुमच्याकडे चार्जिंगसाठी कमी वेळ आहे तर अशावेळी फोन स्विचऑफ करुन चार्जिंग करा. यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये एअरप्लेन हा मोड असतो. फोन चार्जिंग करताना हा मोड सुरु केल्यास तुमचा फोन लवकर चार्ज होण्यास मदत होईल.