स्नॅपडीलचा धमाकेदार सेल, आयफोनसह स्वस्तात इलेक्ट्रॉनिक सामान

ई-कॉमर्स वेबसाइट स्नॅपडीलनं या फेस्टिव्ह सिझनसाठी खास इलेक्ट्रॉनिक सेल सोमवारपासून सुरू केलाय. कंपनीनं या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टिव्हीसह घरातील इतर सामानांवर सुट दिलीय.

Updated: Oct 12, 2015, 07:00 PM IST
स्नॅपडीलचा धमाकेदार सेल, आयफोनसह स्वस्तात इलेक्ट्रॉनिक सामान title=

मुंबई: ई-कॉमर्स वेबसाइट स्नॅपडीलनं या फेस्टिव्ह सिझनसाठी खास इलेक्ट्रॉनिक सेल सोमवारपासून सुरू केलाय. कंपनीनं या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टिव्हीसह घरातील इतर सामानांवर सुट दिलीय.

आपल्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या काही खास ऑफर पाहा -

Google Nexus 5 आणि Chromecast: ३२,९८ रुपयांमध्ये मिळणारा हा स्मार्टफोन या सेलमध्ये अवघ्या १७,९९९ रुपयांमध्ये मिळतोय. सोबतच २,३०० रुपये किमतीचा गूगल क्रोमकास्ट मोफत दिला जातोय.

Ambrane 13000mAh पावर बँक: आपण जर पावर बँक विकत घ्यायचा विचार करताय. तर ही चांगली संधी आहे. १३,००० mAhची पावर बँक अवघ्या ९९९ रुपयांत आपण घेऊ शकतो. या पावर बँकची खरी किंमत बाजारात २,४९९ रुपये एवढी आहे.

Xiaomi Mi 4i 16GB: शायोमीच्या या फोनची खरी किंमत १२,९९९ रुपये आहे. पण स्नॅपडीलच्या सेलवर हा स्मार्टफोन अवघ्या ९,९९९ रुपयांत मिळतोय.

Apple iPhone: iPhone 6 चा 16GB वॅरिएंटची किंमत पहिले ५०,००० रुपये होती. पण हा फोन स्नॅपडीलच्या सेलमध्ये ३६,९९९ रुपयांत विकला जातोय. iPhone 6 64GB वॅरिएंट पहिले ६१ हजार रुपयांचा आहे तो सेलमध्ये ४५,४९९ रुपयांत मिळतोय. तेव्हा चला शॉपिंग करा... 

आणखी वाचा - फ्लिपकार्टचा ऑनलाईन खरेदीसाठी 'बिग बिलियन डे' अॅप सेल!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.