'आयफोन 6 एस'साठी स्वत:च्या किडन्या विकण्याचा प्रयत्न

चीनममधील जियांगसूमध्ये आयफोन सिक्स S खरेदी करण्यासाठी दोन जणांनी आपल्या किडन्या विकण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. ऑनलाईन या दोन्ही जणांनी एजन्टना किडनी विकण्यासाठी संपर्क केला होता, हांग आणि वू असं या दोन जणांचं नाव आहे.

Updated: Sep 16, 2015, 01:57 PM IST
'आयफोन 6 एस'साठी स्वत:च्या किडन्या विकण्याचा प्रयत्न title=

बिजिंग : चीनममधील जियांगसूमध्ये आयफोन सिक्स S खरेदी करण्यासाठी दोन जणांनी आपल्या किडन्या विकण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. ऑनलाईन या दोन्ही जणांनी एजन्टना किडनी विकण्यासाठी संपर्क केला होता, हांग आणि वू असं या दोन जणांचं नाव आहे.

मेडिकल चाचणीसाठी हॉस्पिटल गाठलं पण...
किडन्या विकून या दोन्ही जणांना आयफोन 6 एस खरेदी करायचा होता. यासाठी नानझिंगच्या हॉस्पिटलमध्ये वू आपली वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेला होता, पण त्या दिवशी एजंट आला नव्हता.

या आधीही किडनी विकण्याचा प्रयत्न
चीनमध्ये हे पहिल्यांदाच असं घडलेलं नाही, 2012 साली पश्चिम चीनमध्ये पाच लोकांना बेकायदेशीर किडनी विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. चीनची स्थानिक न्यूज एजन्सी झिनुआने दिलेल्या माहितीनुसार एका मुलाला त्याच्या किडनीसाठी 3 हजार डॉलर देण्यात आले होते. या पैशांतून त्याला आयफोन आणि आयपॅड खरेदी करायचं होतं.

तान्ह्या बाळाला विकण्याचा प्रयत्न
जेव्हा आयफोन 5 रिलीज झाला होता, तेव्हा चीनमध्ये एका जोडप्याला आपलं लहानसं बाळ विकतांना अटक करण्यात आली होती. एका बाळाच्या बदल्यात त्यांना 13 हजार डॉलर ऑफर करण्यात आले होते.

आयफोनसाठी हुंडा मागितला
आयफोन 6 रिलीज झाला तेव्हा चीनमध्ये एका विद्यार्थ्याने आपल्या गर्लफ्रेन्डला भाड्यावर बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला होता, कारण त्याला आयफोन खरेदी करायचा होता. त्याचवेळी दुसरीकडे सौदी अरेबियात आयफोन 6 एस खरेदीसाठी एकाने सासऱ्याकडे हुंड्यांची मागणी केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.