तुमची हरवलेली चावी शोधणार हे अॅप

अनेकदा तुमची चावी तुम्हाला शोधूनही मिळत नाही. चावी कुठे ठेवली हेच आपल्याला आठवत नाही त्यामुळे अनेक अडचणीला आपणास समोर जावं लागतंय. मात्र आता चावी कुठेही विसरा चावी तुम्हाला सहज मिळेल. 

Updated: Feb 23, 2016, 02:17 PM IST
 तुमची हरवलेली चावी शोधणार हे अॅप title=

पिंपरी-चिंचवड : अनेकदा तुमची चावी तुम्हाला शोधूनही मिळत नाही. चावी कुठे ठेवली हेच आपल्याला आठवत नाही त्यामुळे अनेक अडचणीला आपणास समोर जावं लागतंय. मात्र आता चावी कुठेही विसरा चावी तुम्हाला सहज मिळेल. 

पिंपरीतल्या प्राजक्ता वाघेर आणि प्राजक्ता काळभोर या दोन विद्यार्थिनींनी अत्यंत उपयुक्त ऐप्लिकेशन तयार केलंय. तुमच्या चावीला एक सर्किट बसवलं जातं. ते सर्किट तुमच्या मोबाईललाही कनेक्ट केलं जाईल. तुमची चावी हरवल्यास तुमच्या मोबाईलवर चावीचं लोकशन दिसणार आहे. या अॅपच त्यांना पेटंटही मिळालंय.

आजची पिढी स्मार्ट आहे त्यामुळे ते  केवळ पुस्तकी ज्ञान न घेता त्याचा उपयोग प्रत्यक्षात कसा होईल याकडे भर देतायेत. या दोन्ही विद्यार्थिनींनी असाच वेगळा विचार करून हे ऍप तयार केलंय. हे ऍप पुढील काही दिवसात तुमच्या भेटीला येणार आहे.