झोपेत ही स्वप्ने तुम्हाला पडतात का?...

रात्रीनंतर आणि सूर्योद्यादरम्यान काही स्वप्ने पडली तर ती खरी होतात असे म्हटले जाते. जर खालील स्वप्ने तुम्हाला या वेळेत पडत असतील तर तुम्ही करोडपती होणार आहात

Updated: Dec 11, 2015, 04:59 PM IST
झोपेत ही स्वप्ने तुम्हाला पडतात का?... title=

नवी दिल्ली : रात्रीनंतर आणि सूर्योद्यादरम्यान काही स्वप्ने पडली तर ती खरी होतात असे म्हटले जाते. जर खालील स्वप्ने तुम्हाला या वेळेत पडत असतील तर तुम्ही करोडपती होणार आहात

जर स्वप्नात बछड्यासह गाय दिसली तर हे संकेत करोडपती बनण्याचे आहेत. 

जर स्वप्नात कोणी लहान मूल चालताना दिसेल तर काही दिवसांतच तुम्हाला खूप सारा पैसा मिळण्याचे संकेत असतात. 

रात्री झोपल्यानंतर विवाहित पुरुषाने स्वप्नात आपली पत्नी बाजूला झोपलेली असल्याचे पाहिल्यास नोकरीत मोठी प्रगतीचे संकेत असतात. लवकरच तुम्ही करोडपती होणार आहात. 

एखाद्या कुमारिकेला स्वप्नात एखादा पुरुष अथवा तिचा प्रियकराशी भेटल्याचे दिसल्यास तिचे लग्न श्रीमंत घरात होऊ शकते अथवा लग्नानंतर ती श्रीमंत होऊ शकते. 

जर कोणी स्वप्नात समोरच्या व्यक्तीकडून एखादी वस्तू हिसकावून घेताना दिसल्यास शेअर मार्केट, दलाली व्यवसायात चांगले यश मिळण्याचे संकेत असतात.

स्वप्नात मुग्यांना पाहिल्यास लवकरच पैसा मिळण्याचे लक्षण मानले जाते

स्वप्नात मंदिर दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. मंदिरातील कलश दिसल्यास तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास असणार आहे. 

स्वप्नात स्वत: कच्चा नारळ खाताना अथवा नारळ वाटताना पाहिल्यास त्या व्यक्तीला लवकरच पैसे मिळण्याचे संकेत असतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.