नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटर सोमवारी ठप्प झाले आणि त्यामुळे काही काळ नेटिझन्स भांबावलेले दिसले. अशीच घटना आज म्हणजेच मंगळवारी सकाळी आणि दुपारीही घडली.
जवळपास १० मिनिटांपर्यंत ट्विटर बंद पडलं. ही गडबड लगेचच दूर करण्यात आली. आज दुपारी कंपनाने ट्वीट करून दिलगिरी व्यक्त केली. "अनेक युजर्सना ट्विटर वापरायला समस्या येतायत याविषयी आम्हाला कल्पना आहे. आम्ही त्यावर काम करतोय" असं ट्वीट कंपनीने केलं.
ट्विटर उघडल्यावर "something is wrong" असा संदेश युजर्सना दिसत होता. तर काही ठिकाणी ते अतिशय संथ गतीने चालत होतं. त्यामुळे ट्वीट करण्यात अनेक समस्या उद्भवत होत्या.
Some users are currently experiencing problems accessing Twitter. We are aware of the issue and are working towards a resolution.
— Twitter Support (@Support) January 19, 2016
मुख्यत्वे युरोप, ब्राझील आणि दक्षिण आशियात ही समस्या जाणवली.