मुंबई : एका आयफोन यूझरनं आपल्या आयफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवलाय... तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष... पण, हा पासवर्ड विशेष आहे...
कारण, या यूझरनं आपल्या मोबाईलला तब्बल ५७ अंकी पासवर्ड ठेवलाय. हा आत्तापर्यंतचा सर्वात जटील आणि सर्वात लांबलचक असा पासवर्ड मानला जातोय.
जपानमध्ये एका व्यक्तीनं चालत्या ट्रेनमध्ये एका सहप्रवाशाचा व्हिडिओ शूट करून तो यूट्यूबवर अपलोड केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ भलताच वायरल झालाय.
या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रियाही नोंदवल्यात... यातल्या काही जणांनी हा पासवर्ड आपण ओळखल्याचंही म्हटलंय... हा व्हिडिओ पाहा आणि पाहा, तुम्हाला हा पासवर्ड ओळखणं जमतंय का...
व्हिडिओ पाहा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.