VIDEO : कॅमेऱ्यात कैद झालाय अद्भूत शक्तीचा वास!

भुता-खेतांच्या अनेक कथा तुम्ही एव्हाना ऐकल्या असतील... पण, तुमचा या कथा-कहाण्यांवर विश्वास बसला नसेल... पण, आता मात्र असं काही घडलंय ज्यामुळे तुम्ही भुतं असतात की नसतात? या प्रश्नावर पुन्हा एकदा विचार कराल.

Updated: Feb 3, 2016, 04:00 PM IST
VIDEO : कॅमेऱ्यात कैद झालाय अद्भूत शक्तीचा वास! title=

मुंबई : भुता-खेतांच्या अनेक कथा तुम्ही एव्हाना ऐकल्या असतील... पण, तुमचा या कथा-कहाण्यांवर विश्वास बसला नसेल... पण, आता मात्र असं काही घडलंय ज्यामुळे तुम्ही भुतं असतात की नसतात? या प्रश्नावर पुन्हा एकदा विचार कराल.

भुतांच्या आकृत्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी एका कॅमेऱ्यानं मात्र एका भुताच्या आकृतीला छबीत कैद केलंय. त्यामुळे या जगात अद्भूत अशा शक्तींचा वास असल्यावर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय.  

या व्हिडिओमध्ये एका दुकानात बसलेल्या सगळ्यांच्या आकृत्या समोरच्या आरशात दिसत आहेत... मात्र, एक व्यक्ती आरशासमोरून जात असतानाही त्याला आरशात कुणीही पाहू शकलं नाही.