मार्क झुकरबर्ग जेव्हा आयर्नमॅन होतो

फेसबूक आता स्नॅपचॅट थंडरची चोरी करून आपल्या व्हिडिओ मेसेजिंग सर्व्हिस सुरू करणार आहे.  सोशल मीडियामध्ये आघाडीची साइट असलेले फेसबूक आता आपल्या व्हिडिओ चॅटिंगमध्ये युजर्ससाठी फेसचेंजिंग फिल्टर उपलब्ध करून देणार आहे. 

Updated: Mar 11, 2016, 09:46 PM IST
मार्क झुकरबर्ग जेव्हा आयर्नमॅन होतो title=

न्यू यॉर्क : फेसबूक आता स्नॅपचॅट थंडरची चोरी करून आपल्या व्हिडिओ मेसेजिंग सर्व्हिस सुरू करणार आहे.  सोशल मीडियामध्ये आघाडीची साइट असलेले फेसबूक आता आपल्या व्हिडिओ चॅटिंगमध्ये युजर्ससाठी फेसचेंजिंग फिल्टर उपलब्ध करून देणार आहे. 

फेसबूकचा सीईओ  मार्क झुकरबर्ग सध्या या नव्या पाहुण्याला फेसबूकमध्ये समाविष्ट करण्यासाठी कोडिंग करत आहे आणि तो या कामात खूप व्यस्त आहे. 

मार्कने नव्या मास्क्यूरॅड टीमचे स्वागत केले आहे. त्यासाठी त्याने एक व्हिडिओ फेसबूकवर पोस्ट केला आहे. त्यात तो स्वतः आयर्नमॅनचा मुखवटा घालून चॅटिंग करताना दिसत आहे. 

 

Taking a break from coding to welcome the MSQRD team to Facebook!

Posted by Mark Zuckerberg on Wednesday, March 9, 2016