व्हॉटस अॅप : नव्या वर्जनबद्दल सर्वात आधीजाणून घ्या!

व्हॉटस अॅपच्या नव्या फीचर्सची सर्वच जण वाट पाहत असतात. आता एक अब्ज लोकांनी व्हॉटस अॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर व्हॉटस अॅपकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.

Updated: Feb 8, 2016, 04:43 PM IST
व्हॉटस अॅप : नव्या वर्जनबद्दल सर्वात आधीजाणून घ्या! title=

मुंबई : व्हॉटस अॅपच्या नव्या फीचर्सची सर्वच जण वाट पाहत असतात. आता एक अब्ज लोकांनी व्हॉटस अॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर व्हॉटस अॅपकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.

व्हॉटस अॅपवर व्हिडीओ कॉलिंग सुरू होईल अशी अपेक्षा या वर्षी केली जात आहे. व्हॉटस अॅपवर कोणते फीचर्स येणार आहेत, याची माहिती तुम्हाला तुमच्या मित्रांपेक्षा लवकर होऊ शकते.

आता तुम्ही असा अॅप डाऊनलोड करू शकतात, ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉटस अॅपचे बीटा रिलीज आपोआप इन्स्टॉल होतील. बीटा म्हणजे जे प्रायोगिक तत्वावर किंवा नुकतेच लॉन्च आहेत, पण अजून अधिकृतपणे आलेले नाहीत.

यासाठी तुम्हाला फक्त एक बटन दाबावं लागेल, पण आपल्या स्मार्टफोनवर अननोन सोर्सेस इनेबल करणे महत्वाचे असेल.

गिटहबवर गेल्यानंतर तुम्ही बीटा अपडेटर फाईल डाऊनलोड करा. यानंतर तुमचं व्हॉटस अॅप लॉन्च केल्यानंतर गिअर सारखा जो आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा.

सेटिंग्जला तुमच्या गरजेनुसार बदला, कारण डिफॉल्ट सेटिंग्जनुसार, तुम्हाला नोटिफिकेशन तेव्हाच मिळेल, जेव्हा व्हॉटस अॅपचं नवं वर्जन येईल.

यानंतर 'ऑटो डाऊनलोड अपडेट'नुसार बॉक्सवर टिक करा. यानंतर बीटाचं वर्जन अपडेट होईल, याबाबतीत तुम्हाला माहिती मिळेल, यानंतर तुम्हाला इन्स्टॉलवर क्लिक करावं लागेल, ज्यानंतर तुमच्या जवळ सर्वात नवं वर्जन असेल.