नवी दिल्ली : मॅसेजिंग अॅप 'व्हॉटस् अप'नं व्हाईस कॉलिंग अॅप स्काईपला टक्कर द्यायचं आता पक्क केलेलं दिसतंय.
व्हॉटस अपच्या 'कॉलिंग फिचर' टेस्टिंगचे काही फोटो लीक झालेत... यामुळे, मोबाईल कंपन्यांनी चांगलाच धसका घेतलाय.
नुकताच, डच साईट अँन्ड्राईड वर्ल्डनं एक स्क्रिनशॉट जाहीर केलाय. हा स्क्रिनशॉट व्हॉटसअपच्या टेस्ट कोडचा आहे. हा स्क्रिनशॉट नेदरलँडची एक वेबसाईट अँन्ड्राईड वर्ल्डनं लीक केलंय. अशा पद्धतीनं व्हॉटस अॅप युझर्स अॅपवरूनच व्हॉईस कॉलिंगही करू शकतील, असं यावर म्हटलं गेलंय.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यूझर्सना आपल्या सर्व कॉन्टॅक्टसना व्हॉईस कॉलिंग करणं तितकंच सोप्प असेल जितक्या सोप्या पद्धतीनं तुम्ही सध्या व्हॉटसअपवर मॅसेज करताय.
याच महिन्याच्या सुरुवातीला, व्हॉटसअपनं आपल्या अॅपमध्ये सुधारणा करत 'रीड मॅसेजेस रिसिव्ह' करण्यासाठी 'ब्लू टीक'चं नवं फिचर लॉन्च केलं होतं. तर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात १९ बिलियन डॉलर्समध्ये फेसबुकनं व्हॉटस्अप विकत घेतलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.