WhatsApp लवकरच लॉन्च करणार 'WhatsApp Plus'

जर आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर वेळोवेळी काहीतरी नवं करावं लागतं. बहुतेक हीच बाब ऑनलाइन मॅसेंजर सेवा देणाऱ्या व्हॉट्स अॅपच्या ऑपरेचर्सच्या लक्षात आलेली दिसते. 

Updated: Jan 20, 2015, 08:43 AM IST
WhatsApp लवकरच लॉन्च करणार 'WhatsApp Plus' title=

मुंबई: जर आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर वेळोवेळी काहीतरी नवं करावं लागतं. बहुतेक हीच बाब ऑनलाइन मॅसेंजर सेवा देणाऱ्या व्हॉट्स अॅपच्या ऑपरेचर्सच्या लक्षात आलेली दिसते. 

बातमी आहे की, व्हॉट्स अॅप सध्या एका नव्या मॅसेंजरवर काम करत आहे. ज्याला 'व्हॉट्स अॅप प्लस' हे नाव दिलं गेलंय. व्हॉट्स अॅप प्लसमध्ये नेमकं काय खास असणार हे अजून कळलं नसलं तरी मीडिया रिपोर्टनुसार व्हॉट्स अॅप प्लसमध्ये काही नवीन स्माइली असतील. ज्या आपल्या भावना अधिक चांगल्या पद्धतीनं प्रदर्शित करू शकतील. यात नव्या थीम्सचं पण ऑप्शन असेल जे आपल्या मूडनुसार आपण बदलू शकाल.

यासोबतच 'व्हॉट्स अॅप प्लस'मध्ये आपल्याजवळ मॅसेंजरद्वारे मोठी फाईल शेअरिंग करण्याचं ऑप्शन असेल. काही काळापूर्वी व्हॉट्स अॅपनं 'डबल ब्लू टिक्स' फीचर लॉन्च केलं होतं. ज्यामुळे आपल्याला आपला मॅसेज समोरच्या व्यक्तीनं वाचला हे कळतं. व्हॉट्स अॅपच्या या फीचरला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

आता 'व्हॉट्स अॅप प्लस'बाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाहीय. मात्र व्हॉट्स अॅपच्या फॅन्सना या नव्या फीचरची खूप उत्सुकता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.