एक सेकंद उशिराने सुरु होणार २०१७चे वर्ष

यंदा नवे वर्ष एक सेकंद उशिराने सुरु होतंय. वाचून काहीसं आश्चर्य वाटलं ना. २०१६ हे वर्ष एक सेकंद उशिराने संपणार आणि नवे वर्ष एक सेकंद उशिराने सुरु होणार.

Updated: Dec 31, 2016, 12:49 PM IST
एक सेकंद उशिराने सुरु होणार २०१७चे वर्ष title=

मुंबई : यंदा नवे वर्ष एक सेकंद उशिराने सुरु होतंय. वाचून काहीसं आश्चर्य वाटलं ना. २०१६ हे वर्ष एक सेकंद उशिराने संपणार आणि नवे वर्ष एक सेकंद उशिराने सुरु होणार.

विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास यावर्षी ३१ डिसेंबरमध्ये एक लीप सेकंद जोडले जातेय. हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात नवे वर्ष एक सेकंद उशिराने सुरु होणार आहे. १९७२ पासून आतापर्यंत ३६ वेळा असे घडलेय. 

लीप सेकंद म्हणजे काय?

पृथ्वीच्या स्वत:च्या कक्षेत फिरत असल्याने दिवस-रात्र होते. पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. वैज्ञानिक भाषेत याला अॅस्ट्रॉनॉमिकल टाईम म्हणतात. मात्र पृथ्वीचा स्वत:भोवती प्रदक्षिणा घालण्याचा वेग कधी कमी असतो तर कधी जास्त असतो. यामुळेच पृथ्वीच्या प्रदक्षिणेसाठी लागणाऱ्या वेळेत ०.९ सेकंदापर्यंतचा बदल होतो. जो आपल्याला जाणवत नाही. आजच्या दिवशीही असेच होणार आहे त्यामुळेच यंदाचे न्यूईयर एक सेकंद उशिराने सुरु होणार आहे.