नेहमी एकाच रंगाचा टीशर्ट का वापरतो फेसबुकचा संस्थापक

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा व्हिडीओ तुम्ही अनेक वेळेस पाहिला असेल, मात्र झुकरबर्ग तुम्हाला नेहमीच फिक्कट रंगाच्या टी-शर्टमध्येच दिसतील. हा रंग आणि टीशर्ट आता त्यांची ओळख झाली आहे. हाच टी शर्ट घालून ते आता ऑफिसला जातात.

Updated: Jan 27, 2016, 08:56 AM IST
नेहमी एकाच रंगाचा टीशर्ट का वापरतो फेसबुकचा संस्थापक title=

मुंबई : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा व्हिडीओ तुम्ही अनेक वेळेस पाहिला असेल, मात्र झुकरबर्ग तुम्हाला नेहमीच फिक्कट रंगाच्या टी-शर्टमध्येच दिसतील. हा रंग आणि टीशर्ट आता त्यांची ओळख झाली आहे. हाच टी शर्ट घालून ते आता ऑफिसला जातात.

झुकरबर्गने याविषयीचं रहस्य उघड केलं आहे, झुकरबर्गने आपल्या वार्डरोबचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे, यात सारे कपडे एकच रंगाचे आहेत.

झुकरबर्ग २०१४ मध्ये सीईओ झाले होते तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला होता, तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं होतं. यावर झुकरबर्ग म्हणाला होता, माझ्याजवळ एकच टीशर्ट आहे, असं नाही, तर माझ्याजवळ एकाच रंगाचे अनेक टीशर्ट आहेत. 

टीशर्टचा रंग सांगतो की, आपण समाजाबद्दल असलेल्या कर्तव्यांबद्दल कसा विचार करतो. तसेच टीशर्टचा रंग सारख्या लहान गोष्टीत आपण, आपला वेळ घालवत नाही, की ज्या लहान-लहान गोष्टींना जीवनात काहीच महत्व नाही.

 

First day back after paternity leave. What should I wear?

Posted by Mark Zuckerberg on Monday, January 25, 2016