पीएचडी, एमफिलसाठी विद्यार्थीनींना मिळणार अधिक वेळ

पदवी शिक्षण घेऊन पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोदी सरकारनं एक खुशखबर दिलीय. 

Updated: Apr 5, 2016, 04:56 PM IST
पीएचडी, एमफिलसाठी विद्यार्थीनींना मिळणार अधिक वेळ title=

मुंबई : पदवी शिक्षण घेऊन पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोदी सरकारनं एक खुशखबर दिलीय. 

मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इरानी यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि वेगळ्या पद्धतीनं सक्षम विद्यार्थ्यांना एमफिल आणि पीएचडी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थीनींच्या प्रवेशाला प्रोत्साहन मिळू शकेल. 

देशातील विविध शैक्षणिक संस्थांना रँकिंग प्रदान करण्याच्या कार्यक्रमात स्मृती इरानी यांनी ही माहिती दिलीय. उच्च शिक्षणासाठी अनेक महिला प्रवेश घेतात परंतु, कॉलेज आणि विश्वविद्यालयांत मात्र त्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळेच, नियमांमध्ये बदल करण्यासाठी आपल्या मंत्रालयानं यूजीसीकडे ही विनंती केल्याचं त्यांनी म्हटलंय.

'एमफिल'साठी आम्ही दोन वर्षांचा कालावधी वाढवून तीन वर्षांचा केलाय. तर 'पीएचडी'साठीचा कालावधी सहा वर्षांऐवजी आठ वर्ष असेल. 

शिवाय, विद्यार्थ्यांना २४० दिवासांचा मातृत्व अवकाशही मिळेल. ही वेळ त्यांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाहून वेगळा असेल.