मुंबई : चीनची मोबाईल निर्माती कंपनी श्याओमीनं आपला नवा बजेट फोन 'रेडमी २' भारतात लॉन्च केलाय.
'रेडमी २' हा फोन ४जी सपोर्टीव्ह स्मार्टफोन आहे. 'मोटो ई' आणि 'लेनोवो ए ६,०००' या स्मार्टफोन्सना हा फोन जोरदार टक्कर देणार असं दिसतंय.
हा ड्युएल सिम फोन आहे. या फोनमध्ये ६४ बिट १.२ जीएचझोड क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन ४०० प्रोसेसर उपलब्ध आहे. या फोनमध्ये २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे, या स्मार्टफोनमध्ये क्विक चार्ज टेक्नोलॉजी दिली गेलीय.
'रेडमी २'ची वैशिष्ट्ये...
स्क्रीन - ४.७ इंच हायडेफिनेशन, ड्रॅगन ट्रेल ग्लास
ऑपरेटिंग सिस्टम - अँन्ड्रॉईड ४.४ एमआययूआय ६.०००
प्रोसेसर - स्नॅपड्रॅगन ४१० क्वॉड कोर (६४ बिट)
कॅमेरा - ८ मेगापिक्सल, एलईडी फ्लॅशसहीत, बीएसआय सेन्सर
फ्रंट कॅमेरा : २ मेगापिक्सल
रॅम - १ जीबी,
इंटरनल स्टोअरेज - ८ जीबी
इतर फिचर्स - ४जी एलटीई, वाय फाय ८०२.११, ब्लूटूथ ४.०, जीपीएस, यूएसबी
बॅटरी - २२०० मेगाहर्टझ
रंग - गुलाबी, हिरवा, पिवळा, करडा, पांढरा
'फ्लिपकार्ट' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर या मोबाईलची किंमत आहे ६,९९९ रुपये. हा स्मार्टफोन बाजारात २४ मार्चपासून उपलब्ध होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.