मुंबई : चीनी मोबाईल कंपनी 'श्याओमी'नं आपला नवा स्मार्टफोन Mi 4c लॉन्च केलाय. दोन व्हेरिएन्टसमध्ये कंपनीनं हा स्मार्टफोन बाजारात आणलाय.
२ जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरीसहीत एक स्मार्टफोन तर दुसऱ्यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरीसोबत दुसरा स्मार्टफोन उपलब्ध आहे.
Mi 4c आजपासून चीनच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालाय. लवकरच हा भारतातही दाखल होणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, कंपनीचा हा पहिलाच यूएसबी टाईप-सी पोर्ट फिचर असलेला स्मार्टफोन आहे. यासोबतच कंपनीनं यूएसबी टाईप-सी पोर्टसहीत अॅडॉप्टरही लॉन्च केलाय.
या स्मार्टफोनमध्ये Edge Tap technology चा वापर करण्यात आलाय. यामुळे तुम्ही स्मार्टफोनच्या कडांवर टॅप करून वेगवेगळ्या कमांडस् देऊ शकता. कंपनीनं ही आपली पेटंट टेक्नॉलॉजी असल्याचा दावा केलाय.
Mi 4cचे काही उल्लेखनीय फिचर्स...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.