रजिस्ट्रेशन न करता मिळवा शाओमीचा एमआय ५ स्मार्टफोन

शाओमीचा एमआय ५ हा स्मार्टफोन तुम्हाला आता विदाऊट रजिस्ट्रेशन घेता येणार आहे. येत्या ४ मेला ओपन सेलमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. 

Updated: May 2, 2016, 03:53 PM IST
रजिस्ट्रेशन न करता मिळवा शाओमीचा एमआय ५ स्मार्टफोन title=

मुंबई : शाओमीचा एमआय ५ हा स्मार्टफोन तुम्हाला आता विदाऊट रजिस्ट्रेशन घेता येणार आहे. येत्या ४ मेला ओपन सेलमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. 

पाच मार्च रोजी कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये ५.१५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. याचा फ्रंट कॅमेरा ४ मेगापिक्सेल आहे. तर रेयर कॅमेरा १६ मेगापिक्सेल इतका आहे. 

यात क्वालनकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आलाय. तसेच ३२ जीबी स्टोरेजची क्षमता आहे. यात ३ जीबी रॅम देण्यात आलाय. या स्मार्टफोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये इतकी आहे.