३ जीबी रॅमसहीत 'झोलो'चा नवा स्मार्टफोन!

मोबाईल निर्माता कंपनी झोलोनं आपल्या ब्लॅक सीरिजमध्ये ग्राहकांना खुशखबर दिलीय. तब्बल ३ जीबी रॅमसहीत झोलोनं आपला नवा स्मार्टफोन सादर केलाय. 

Updated: Dec 24, 2015, 03:01 PM IST
३ जीबी रॅमसहीत 'झोलो'चा नवा स्मार्टफोन! title=

मुंबई : मोबाईल निर्माता कंपनी झोलोनं आपल्या ब्लॅक सीरिजमध्ये ग्राहकांना खुशखबर दिलीय. तब्बल ३ जीबी रॅमसहीत झोलोनं आपला नवा स्मार्टफोन सादर केलाय. 

'ब्लॅक ३ जीबी' या फोनच्या रॅममुळे साहजिकच यामुळे ग्राहकांना डाटा ट्रान्सफरसाठी दुप्पट स्पीड मिळेल.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक ३ जीबी ऑनलाईन मार्केट प्लॅटफॉर्म 'स्नॅपडील'वर उपलब्ध होईल. या फोनची बुकिंग आजपासून सुरू झालीय. २९ डिसेंबरपर्यंत ही बुकिंग तुम्हाला करता येईल. 

दुसऱ्या पीढीच्या ६४ बिट १.५ गिगाहर्टझ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ ऑक्टकोर प्रोसेसर असणाऱ्या फोनमध्ये १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. ही क्षमता मेमरी कार्डच्या साहाय्यानं ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

५.५ इंचाच्या एचडी ओजीएस आयपीएस डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये दोन सीम स्लॉट आहेत यापैंकी एक स्लॉट सिम किंवा एसडी कार्डप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा ड्युएल रिअर कॅमेरा यात देण्यात आलाय. 

या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये आहे.