मुंबई: स्मार्टफोन बनवणारी कंपनी झोलोनं 'ब्लॅक' सीरिज नावानं एक नवा स्मार्टफोन केलाय. ज्याची किंमत अवघी १२,९९९ रुपये आहे. ऑनलाइन स्टोअर फ्लिपकार्टवर फोन उपलब्ध असून फोनची विक्री १३ जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.
लावा इंटरनॅशनल (झोलो आणि लावाचे ब्रँडचे प्रमोटोर)चे सहसंस्थापक आणि संचालक विशाल सहगल यांनी सांगितलं की, 'भारतात ऑनलाइन स्मार्टफोन बाजार जलदगतीनं विकसित होतोय. ब्लॅक स्मार्टफोन हा उत्तम स्मार्टफोनचा अनुभव देईल.'
ते म्हणाले, 'ब्लॅक सीरिज अंतर्गत हा स्मार्टफोन फ्युचर रेडी टेक्नॉलॉजी आणि संपूर्ण क्षमतेच्या हार्डवेअरनं परिपूर्ण असेल.'
नव्या स्मार्टफोनमध्ये सेकंड जनरेशन ६४ बिट ऑक्टाकोर क्लॉलकम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर आणि जीबी डीडीआर ३ रॅम लागलाय. हा फोन हाइव यूजर इंटरफेस (यूआय)चं नवं रूप हाअव अॅटलॅसपासून अपडेट आणि आणि अँड्रॉईडच्या लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतोय.
स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचचा फुल एचडी डिस्प्ले आहे. ज्याची पिक्सेल डेन्सिटी ४०१ पीपीआय आहे. कॉर्निया ग्लास ३ प्रोटेक्शन सुद्धा आहे. जे पुढे आणि मागे दोन्हीकडे लागलेय.
या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी इटरनल स्टोरेज आहे. जे ३२ जीबीपर्यंत एक्सटेंड करू शकतो. हा फोन ४०जी एलटीईला सपोर्ट कसतो. ज्यात ड्युअल सिम स्लॉट आहे. १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेलाय. यात ३२००mAhची बॅटरी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.