३१ डिसेंबरनंतर या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप होणार बंद

 सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिम तुम्हांला आठवते का? ही ऑपरेटिंग सिस्टिम जी नोकियाच्या हाय एंड फोनमध्ये येत होती. N सिरीजच्या स्मार्टफोन यावर चालत होते. त्यानंतर N8 स्मार्टफोन आला यातही सिंबियन होते. पण अजूनही तुम्ही सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिमचा फोन वापरत असेल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. आता या फोनवर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. 

Updated: Nov 2, 2016, 06:25 PM IST
३१ डिसेंबरनंतर या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप होणार बंद  title=

मुंबई :  सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिम तुम्हांला आठवते का? ही ऑपरेटिंग सिस्टिम जी नोकियाच्या हाय एंड फोनमध्ये येत होती. N सिरीजच्या स्मार्टफोन यावर चालत होते. त्यानंतर N8 स्मार्टफोन आला यातही सिंबियन होते. पण अजूनही तुम्ही सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिमचा फोन वापरत असेल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. आता या फोनवर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. 

तसेच सिंबियनसह विंडोज आणि ब्लॅकबेरीच्या अनेक फोनवर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. नोकिया s40 आणि नोकिया सिंबियन s60 यांच्यावर सपोर्ट नाही मिळणार...

कंपनीने आपल्या एका ब्लॉगमध्ये म्हटले की Android च्या २.२ व्हर्जनचाही व्हॉट्सअॅप सपोर्ट काढण्यात येणार आहे. तसेच Windows ७.१ स्मार्टफोनचाही सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. हे फोन आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत पण आता त्यांच्यात ती क्षमता नाही, की त्यावर व्हॉट्सअॅपचे सर्व फिचर सुरू राहतील, असे ब्लॉगमध्ये म्हटले आहे. 

हा खूप कठीण निर्णय आहे, पण हा अशा लोकांच्या हितासाठी आहे की जे आपल्या फॅमिली, फ्रेंड्स आणि आपल्या जवळच्या माणसांशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. 

तुमच्याकडे वरील फोन असतील तर ते व्हॉट्सअॅपसाठी कामाचे राहणार नाही. त्यामुळे तुम्हांला नवीन फोन विकत घ्यावा लागणार आहे. 

काय होणार व्हॉट्सअॅपचे...
३ १ डिसेंबरला काही फोन्सचा व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणरा आहे. यात सिक्युरीटी संदर्भातील महत्त्वाचे अपडेट बंद होती. तसेच अशा स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाही. 

काही असे सिंबियन फोन जे आजही लोक वापरतात... 
 Nokia E6
 Nokia 5233
Nokia C5 03
 Nokia Asha 306
Nokia E52

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x