तुमच्या आवडत्या व्हॉट्सअॅपवर बंदी येऊ शकते

 जगातील लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस व्हॉटस अॅपने आपल्या युझर्ससाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे व्हॉट्सअॅप भारतात बंदी येऊ शकते. 

Updated: Apr 11, 2016, 04:48 PM IST
तुमच्या आवडत्या व्हॉट्सअॅपवर बंदी येऊ शकते title=

नवी दिल्ली :  जगातील लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस व्हॉटस अॅपने आपल्या युझर्ससाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे व्हॉट्सअॅप भारतात बंदी येऊ शकते. 

व्हॉटसअॅपवरील तुमचे मेसेज आता कुणीही हॅक करू शकणार नाही, किंवा कोणतीही संस्था ते पाहू शकत नाही, एवढंच काय तर संबंधित देशातील सरकारही ते उघडू शकत नाही, हाच यातील मोठा प्रॉब्लेम व्हॉट्सअॅपला फेस करावा लागू शकतो. 

व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सला अशी सुरक्षा देऊन काही चूक केलेली नाही. पण भारतीय सुरक्षा एजन्सीनुसार त्यांनी हे योग्य केलेले नाही. 

काय म्हणतो कायदा 

भारताच्या कायद्यानुसार OTT किंवा Over The Top services जशा व्हॉटसअॅप, स्कायप, वायबर, यांना इस्क्रीप्शन लागू करता येणार नाही. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाडर्समार्फत ही सेवा देण्यात येते. 

भारतात व्होडाफोन, एअरटेल यांनना केवळ ४० बीट इन्स्क्रिप्शन मान्य आहे. तर व्हॉट्सअॅप २५६ बीट इन्स्क्रिप्शन दिले आहे. 

व्हॉट्सअॅपचे ७ कोटी युजर्स आहेत. या सर्वांना नियमातून वगळू शकत नाही. त्यामुळे लवकरच सुरक्षा यंत्रणा या संदर्भात एक नियमावली जारी करू शकतात.