मकरंदचा बहारदार 'केशव पाडळशिंगीकर'

प्रशांत अनासपुरे जाऊ बाई जोरात' या नाटकाचे एक हजारांवर प्रयोग केल्यानंतर मकरंद अनासपुरेनं रंगभूमीवरून एकाएकी एक्झीट घेतली. त्यानंतर मालिकांमधले छोटे-मोठे रोल सांभाळत मकरंद सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकू लागला.

Updated: Mar 23, 2012, 08:29 PM IST

प्रशांत अनासपुरे
prashant.anaspure@zeenetwork.com

 

'जाऊ बाई जोरात' या नाटकाचे एक हजारांवर प्रयोग केल्यानंतर मकरंद अनासपुरेनं रंगभूमीवरून एकाएकी एक्झीट घेतली. त्यानंतर मालिकांमधले छोटे-मोठे रोल सांभाळत मकरंद सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकू लागला. सरकारनामा, सातच्या आत घरात, कायद्याचं बोला  असे एकामागून एक हिट सिनेमे दिल्यानंतर मकरंदकडे सिनेमांच्या दिवसागणिक  ऑफर्स वाढू लागल्या आणि मकरंदच्या नावावर सिनेमा 'भाव' खाऊ लागला.

 

सिनेमांच्या या भाऊगर्दीत नाटकाच्या प्रेक्षकांना मात्र मकरंदचं दर्शन दुर्लभ झालं. स्वतः मकरंदचा पायाही नाटकाच्याच जातकुळीत रोवला गेल्याने त्याची रुखरुख त्याला स्वतःलाही होतीच. आणि एका मोठ्या ब्रेकनंतर केशवा-माधवा या सुयोगची निर्मिती असलेल्या नाटकातून मकरंदनं पुन्हा एकदा रंगभूमीवर 'केशवा-माधवा' या नाटकातून एन्ट्री केलीयं. कायद्याचं बोला या सिनेमातील 'कुंथलगिरीकर'नंतर आता यात मकरंद केशव 'पाडळशिंगीकर'च्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर हजर झालाय. पाडळशिंगीकर आडनावाचं विशेष म्हणजे ज्या बीड जिल्ह्यातून मकरंद आलाय, त्या बीडजवळच 'पाडळशिंगी' नावाचं एक गाव आहे. असो,

 

काय आहे नाटक ? 

केशव पाडळशिंगीकर  (मकरंद अनासपुरे) या होतकरू दुकानदाराचा जुन्या-पुराण्या मात्र काहीशा हटके वस्तू विकण्याचा धंदा. धंदा म्हणण्याचं कारण असं, की या वस्तू रामायण-महाभारत काळातल्या आहेत, अशी 'फेकाफेकी' करत हा केशव गि-हाईकांना 'टोपी' घालून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत असतो. केशवची बायको राधा (विनीता काळे) मूल होत नाही, म्हणून देवाला सतत साकडं घालणारी. एक दिवस केशव श्रीकृष्णची मुर्ती दुकानाबाहेर भिरकावतो आणि त्याक्षणी भूकंप होतो. यात केशव आणि राधाचं दुकान उध्वस्त होतं. अर्थातच याचं खापर राधा केशववर फोडते. देवाची अशी क्रूर थट्टा केल्यानेच असा प्रसंग उद्भवल्याची तिची समजूत होते.

 

केशवला मात्र हे मान्य नसतं. जगात देव आहे का, आणि असेल तर तो प्रत्यक्ष का दिसत नाही असा रोखठोक सवाल करत केशव देवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आपल्या दुकानाची नुकसानभरपाई म्हणून विमा मिळावा म्हणून हा केशव लढाई पुकारतो. यातून एकामागोमाग एक घटना घडत जातात. यात मग देवाच्या नावावर करोडोंचा गल्ला जमविणा-यांनाही तो कोर्टात खेचतो. सरतेशेवटी स्वतः देवालाच केशवाला दर्शन द्यावे लागते.  मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो, मकरंदचे निधन होते, आणि त्यानंतरही केशवच्या नावावर श्रद्धा-अंधश्रद्धेचा बाजार मांडला जातो, की ज्या अंधश्रद्धेचा स्वतः केशवला प्रचंड तिटकारा-राग असतो. केशवनं देवाशी पुकारलेला लढा प्रत्येक टप्प्यागणिक अधिक रंगत जातो आणि अंतर्मुख करतो.

अभिनयाची जुगलबंदी

केशव पाडळशिंगीकरच्या भूमिकेत मकरंदने अक्षरशः धमाल आणली आहे. स्टेजवरचा सहज-सोपा वावर आणि ठेवणीतल्या अस्सल मराठमोळ्या  गावरान फोडणी असलेल्या डायलॉग्जमुळं  प्रेक्षकांना मकरंदचा हा लाईव्ह परफॉर्मन्स चांगलाच भावतो. कृष्ण व्हर्सेस कन्हैय्या या हिंदी नाटकात परेश रावल, तसंच त्याआधी  सचिन खेडेकर यांनी  आपल्या अभिनयाद्वारे हे नाटक गाजवलंय. परेश रावल अजूनही हे नाटक गाजवतायेत. त्यामुळे या नाटकाच्या मराठी आवृत्तीत म्हणजेच केशवा-माधवात मकरंदकडून तोडीस तोड अभिनयाची अपेक्षा होतीच.

 

मकरंदने ती पूर्ण केली असं नक्कीच म्हणता येईळ.   तर अतुल अभ्यं