मिले सूर मेरा-तुम्हारा....

‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...’ अक्षरशः असंच चित्र मंगेशकर कुटुंबाच्या घरगुती गणपती विसर्जनच्यावेळी काल आम्हाला पाहायला मिळालं. ढोल-ताशाचा नजरा, बाप्पासाठी खास केलेली फुलांची सजावट, फेटे बांधलेल्या मंगेशकर कुटुंबाचा थाट, आणि यासगळ्यामध्ये सगळ्यांसाठी सुखद धक्का म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले यांचं एकत्र घडलेलं दर्शन...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 30, 2012, 04:08 PM IST

स्मिता मांजरेकर, www.24taas.com,
‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...’ अक्षरशः असंच चित्र मंगेशकर कुटुंबाच्या घरगुती गणपती विसर्जनच्यावेळी काल आम्हाला पाहायला मिळालं. ढोल-ताशाचा नजरा, बाप्पासाठी खास केलेली फुलांची सजावट, फेटे बांधलेल्या मंगेशकर कुटुंबाचा थाट, आणि यासगळ्यामध्ये सगळ्यांसाठी सुखद धक्का म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले यांचं एकत्र घडलेलं दर्शन... शेजारी शेजारी राहात असल्या, एकमेकींबद्दल आदराने बोलत असल्या तरी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यातील बेबनावाच्या गोष्टीही जगजाहीर आहेत. व्यावसायिक स्पर्धा, वैयक्तिक मतभेद अशा कित्येक कारणांवरून लतादीदी आणि आशाताई यांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. दोघींमधील वाद हा गेली कित्येक वर्षं मिटलेला नाही. मात्र काल आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लता मंगेशकर यांच्यासह आशाताईंचीही पावलं गणरायाला निरोप देण्यासाठी वळली, आणि आम्हा सर्वांनाच सुखद आश्चर्याचा धक्का बसला.
ढोल ताशांचा नगारा ऐकताच आशाताईंनी आधी बाल्कनीमधूनच टाळ्या वाजवत गणरायाच्या जल्लोषात सहभाग घेतला. हात उंचावून आशाताई प्रभुकुंज समोरील गर्दीला अभिवादन केलं. तर दुसरीकडे मंगेशकर कुटुंबाची गणरायाला निरोप देण्यासाठी लगबग सुरू होती. स्वत: लता दीदी गणरायाला मोठ्या श्रध्देने निरोप देत होत्या. याक्षणी लतादीदी थोड्या भावूकही झाल्या होत्या. अखेर हा जल्लोष आणि उत्साह पाहून आशाताईंनाही राहवलं नाही आणि मग बाल्कीनीमधून गणरायाला निरोप देण्याऐवजी त्या ही खाली येऊन बाकी कुटुंबात सामील झाल्या. गणपती बाप्पाने खरोखरच काही काळ दोघी बहिणींमधला दुरावा कमी केला. यावेळी ढोल-ताशाच्या तालावर त्यांची पावलंदेखील थिरकत होती. आशाताई टाळ्या वाजवत, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत गणरायाला निरोप देत होत्या, तर गानसम्राज्ञी लता मंगेशकरदेखील ढोल पथकाला साथ देत मान डोलवत हा भारलेल्या वातावरणाला प्रतिसाद देत होत्या. गणपती बाप्पांच्या दर्शनासोबतच लतादीदी आणि आशा भोसले यांचं असं एकत्र दर्शन घडल्याने सर्वच गानप्रेमींसाठी ती मोठी पर्वणी ठरली. त्यामुळे हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी प्रत्येकजण धडपड होता.

गणेशोत्सवासाठी लतादीदींकडे गेलं की नेहमी फिल्म इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटींची रेलचेल दिसते. यात मराठी सेलिब्रिटीदेखिल मंगेशकर कुटुंबाच्या गणरायाचं आवर्जून दर्शन घेतात आणि यानिमित्ताने त्यांना लतादीदींनाही भेटता येतं. अशावेळी नेहमी लतादीदी जुन्या आठवणींमध्ये रमतात. गमतीदार किस्से सांगतात. गणेशोत्सवाचं बदलतं रुप, मंगेशकर कुटुंबातील गणेशोत्सवाची परंपरा, पूजेचं महत्व असं सगळं लतादीदी मनापासून सांगतात. एकदा लता दीदींच्या घरी मी आरतीसाठी गेले असता त्यांच्या भटजींना यायला उशीर झाला. मात्र, यावर लतादीदी मिश्किल हासत म्हणाल्या ‘फक्त फिल्म इंडस्ट्रीमधली मंडळीच नाही तर भटजीदेखिल उशीरा येतात’..उषा मंगेशकर दरवर्षी डेकोरेशनची जबाबदारी सांभाळताना दिसतात...यंदा देखील त्यांनी ही जबाबदारी सांभाळली.

एरव्ही लतादीदींच्या घरी गेलं की सगळं मंगेशकर कुटुंब एकत्र दिसतं मात्र यात आशाताईंचं दर्शन काही होतं नाही मात्र यंदा हा योग जुळून आला...मंगेशकर कुटुंबाच्या गणपती विसर्जनला लतादीदींसह आशाताईंचंही दर्शन घडलं आणि सगळ्यांच्या नजरा आपोआप त्यांच्याकडे रोखल्या गेल्या. कॅमेरांचा लखलखाट सुरू झाला. पत्रकारांची आशाताई आणि लतादीदींची बाईट मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. मात्र त्या दोघीही गणरायाला निरोप देण्यामध्ये मग्न होत्या.

तर दुसरीकडे आदिनाथ मंगेशकरदेखिल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या घरच्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता...सगळ्यांसह आदिनाथनेदेखिल छानसा फेटा बांधला होता. हदयनाथ मंगेशकर यांनीदेखिल सगळ्यांसह गणरायाचं दर्शन घेतलं.
लतादीदींकडे यंदा इको फ्रेन्डली गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती म्हणजेच पंचधातूच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली त्यामुळे त्या मूर्तीचं विसर्जन त्यांनी केलं नाही मात्र या मूर्तीसह शाडूच्या बालगणेश मूर्तीची स्थापना त्यांनी केली होती त्यांचं विसर्जन त्यांनी शाही थाटात केल