ऋषी देसाई
१९७०- सर्वोत्कृष्ट नायक
१९८०- सर्वोत्कृष्ट नायक
१९९०-सर्वोत्कृष्ट नायक
२०००-सर्वोत्कृष्ट नायक
आणि
जानेवारी २०१२ मध्येही - सर्वोत्कृष्ट नायक
मी कुणाबद्दल लिहीतोय, असा प्रश्न नक्की पडला असेल. अनेकजणाना वाटलं असेल बच्चन बद्दल लिहीतोय, पण तसं नाहीय.. मी लिहीतोय ते, महाराष्ट्राच्या जाणत्या राजाबद्दल, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारबद्दल !
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे एकमेव अस नाव आहे, की राजकारणाची सुरुवातही त्याच नावाने होते आणि शेवटही त्याच नावाने ! शरद पवारांबदद्लांच्या पराजंपेच्या खेळीने आता सारेच नतमस्तक झालेयत. शुक्रवारी दुपारी एक पत्रकार परिषद सुरु असताना अचानक पवार पत्रकारांशी संवाद साधताना जे काही घड़ल ते अनाकलीनय असचं होत. पवार पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरे देतायत असा सर्वाचा समज होता, पण पवार वाट पाहत होते ते एका प्रश्नाची . ठाण्यातल्या फोडाफो़डीसंदर्भातला प्रश्न कधी येतोय याची.. खरतर अन्य कुठल्याही नेत्याला तो अडचणीचा वाटला असता, पण पवारांनी अडचणीची संधी कशी करायची त्या बद्दल काय बोलावं महाराजा !
पत्रकारांनी ठाण्यातली घुसमटीचा प्रश्न विचारला. पवारानी माईक चेक केला, माईकची रेंज तपासली देखील. खात्री झाली. माईक बाजूला नेत आपल्य़ा बाजूच्या सहका-याला कानात सांगितले, बाहेर जितेंद्र आहे, त्याला घेऊन ये. ... आणि त्याच्या सोबत एक एमपी पण आहे त्यालाही घेऊन ये. आणि माईकवर तुम्ही काही बोलू नका.. खरतर पवार माईक दूर करुन बोलत होते. खरं तर पवारांच्या हातातला माईक पक्षाशी बांधील होता, पण ओघात हे विसरले की, त्या पत्रकार परिषदेत पवारांच्या समोर टेबलावर ठेवलेले मिडियाचे बूम हे कुठल्याच पक्षाचे नसतात. त्याना फक्त सत्याशी बांधिलकी असते.. बूमने आपलं व्यवस्थित काम केलं आणि ते काय बोलले हे सा-यानी ऐकलंही पण त्यानंतर घडले ते पाहून सारेच आवाक झाले..
...शरद पवार म्हणजे काय हे काल परवा राजकारणात आलेल्या सा-यानाच पुरते कळून चुकले.. पवारांनी शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे याना राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर बोलावलं आणि त्यानंतर पवार जे मिश्कील हसत होते ना, ते नुसतं पाहण्यासारखं.. शह काटशहाच्या राजकारणात पवारांनी सौ सोनार की, एक लोहार की.... अस करत कार्याध्यक्षांना एक चांगली भेट दिलीय असचं आता म्हणावं लागेल.
पण यानिमित्ताने आता राजकारण बदललय, काळ बदललाय, निवडणूकीचा प्रचार सारं सारं बदललय असं सारेच म्हणतील, पण या सा-या बदलात बदलले नाहीत किवा शाश्वत आहेत ते फक्त शरद पवार ! (पवारांच्या राजकारणासमोर नुसतं पाहत बसण्याशिवाय काहीचं उरल नाहीय म्हणा, पण माझ्या पप्पांच्या कुरुक्षेत्र एकांकिकेत एक खूप सुंदर वाक्य होतं.. " पवार हे असे नेते आहेत की, त्यानी पायांनी मारलेली गाठ भल्याभल्याना दातानेही तोडणं शक्य नाही " हे वाक्य मात्र राहून राहून आठवतय, बस्स.)