निवडणुकीची गावठी पद्धत चांगली - बाळासाहेब

मंदार परब प्रदीर्घ काळानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तास या मराठमोळ्या चॅनलची निवड केली. या EXCLUSIVE मुलाखतीतील प्रश्नोत्तर जसेच्या तसे....

Updated: Feb 16, 2012, 12:31 PM IST

मंदार परब

संपादक, झी २४ तास

प्रदीर्घ काळानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे.  यावेळी त्यांनी मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तास या मराठमोळ्या चॅनलची निवड केली. या EXCLUSIVE मुलाखतीतील प्रश्नोत्तर जसेच्या तसे....

भाग- १ 

 

गेली ४५ वर्षे तुम्ही राजकारण पाहत आहे, तुम्हांला कसे वाटते आहे.

बाळासाहेब गेली ४५ वर्ष मी जेव्हापासून शिवसेना स्थापन केली, तेव्हापासून आतापर्यंत मला असं वाटतं केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशातच वातावरण भयानक... भयानक बिघडतं चाललंय...  देश अराजकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कोणाचा कुणाला मागमूस राहिलेला नाही..आपल्या देशात सरकार आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सर्व राज्यात आहे. एक दोन तुरळक राज्य असतील जिथे परिस्थिती जरा चांगली आहे. पण बाकी काय????

 

शिवसेनेची वाटचाल कशी पाहतात तुम्ही?

बाळासाहेब – शिवसेनेची ‘वाट’ ही चांगली आहे आणि ‘चाल’ही चांगली आहे. बरं काय!  शेवटी काय असतं पाऊस पडला तरी आणि पाऊस नाही पडला तरी दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल होत असतात. ज्या ठिकाणी चांगलं पीक असेल अशा ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो, आणि उभी राहिलेली शेती पाण्यात जातात. असे काही तरी होतं. आम्ही काही चांगल्या गोष्टींचा विचार करून उभं राहिल्यावर काही घाणेरड्या गोष्टी चालतात. त्यात आमचं चांगल पीक त्यांना दिसत नाही. आम्ही काय चांगल उगवलं आहं. ते दिसत नाही.  त्यामुळे आमच्या वाईट गोष्टी त्यांना वाईट दिसतात, आणि चांगल्या गोष्टीही त्यांना वाईट दिसतात.

 

मग त्याची कारणं काय वाटतात तुम्हांला?

बाळासाहेब दुःसाहस! इथं राजकारण फार खदखदायला लागलेलं आहे. पूर्वी समाजकारणातून राजकारण केले जायचं. काही नावे घेतो आपण नेहमी, काही ठिकाणी आपली मराठी माणसं बिहारमधून  निवडून आली होती. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. भाषावार प्रांत रचनेच्या भिंती उभी राहिल्या आहेत. आम्ही कमकुवत मनाचे झालो आहोत. आपण कोत्या बुद्धीचे झालो आहोत. 'मी'चा कसला अभिमान बाळगता. मी हा तुमचा अभिमानाचा आहे की अहमगंडाचा आहे. हे तपासून पाहिले पाहिजे.  ज्यांची कुवत नाही असे राज्यकर्ते तुमच्या बोडक्यावर बसले आहेत.  आपण त्याचा स्वीकार केला आहे.

 

मग यात दोष कुणाचा आहे. जनतेचा आहे की आणखी कुणाचा आहे?

बाळासाहेब – जनतेचा म्हणण्यापेक्षा का हो इतकं तुमच्यासमोर नाचतं आहे. तुम्हांला दिसत नाही.  आता चिंदमबरम क्लिनचीटने सुटले!  अजून सुटले नाही मी म्हणेल!  अण्णा हजारे तिकडे भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाला बसायचे. पण मला सांगा कोणाला भ्रष्टाचार हवा आहे. भ्रष्टाचार नकोय! भ्रष्टचार नकोय!  असे सर्व म्हणायचे. सिनेमा नट-नट्या ही 'मै अण्णा हजारे हूँ 'असे म्हणत टोप्या घालून फिरायचे. निवडणुकीच्या तोंडावर एवढा या काँग्रेसने देशाचा बट्याबोळ केला. त्याचं काय? तुम्ही निवडणूक कशाला देतात हो त्यांना? त्यांच्या हातावर कसले डाग आहे. मोबाईल द्यायचे.  (मोबाईलचे लायसन्स). आजच एक बातमी आली आता साड्या वाटणार नाही. म्हणजे आतापर्यंत काय नागडे फिरत होते लोक! निवडणुकीच्या तोंडावर हे काय वाटप सुरू आहे. याने तुम्ही बाटतात आणि दबून काँग्रेस एके काँग्रेस करतात. काही शेंड्या त्यांच्या हातात आहे बँकांसारख्या. शेतकऱ्यांना कर्ज दिल्याच्या ह्यांच्या त्यांच्या.... सावकारी नष्ट होत नाही. सावकारचं यांच्या ताब्यत आहे. मग अशा वेळेस शेतकऱ्य