पानिपत आणि १४ जानेवारी...

ऋषी देसाई खरतर आपल्या कॅलेंडरच्या पानापानावर प्रत्येक दिवशी इतिहासातल्या एकतर आठवणीची किवा भुतकाळातल्या त्या दिवशीच्या आठवणीची नोंद असतेच. अशा ३६५ दिवसातला महाराष्ट्राचा स्वत:चा दिवस म्हणजे १४ जानेवारी. कारण याच दिवशी जोडला गेलाय संदर्भ पानिपताचा.

Updated: Jan 13, 2012, 04:59 PM IST

ऋषी देसाई

rishi.desai@zeenetwork.com

 

खरतर आपल्या कॅलेंडरच्या पानापानावर प्रत्येक दिवशी इतिहासातल्या एकतर आठवणीची किवा भुतकाळातल्या त्या दिवशीच्या आठवणीची नोंद असतेच. अशा ३६५ दिवसातला महाराष्ट्राचा स्वत:चा दिवस म्हणजे १४ जानेवारी. कारण याच दिवशी जोडला गेलाय संदर्भ पानिपताचा.

 

थोडसं आश्चर्य वाटेल की, पानिपत म्हणजे महाराष्ट्राला विसरावी अशी आठवण. पण मग त्याची उजळणी का आणि कशासाठी? पण नाही,  १४ जानेवारी म्हणजे पानपताचा रणसंग्राम आठवून मस्तकाला कुंकुमतिलक लावण्याचाचं दिवस. पुन्हा थोडस्  विचित्र  वाटेल. वाटणारच !  कारण,  आजपर्यंत  इतिहासाच्या पानापानात पानिपत म्हणजे पराभव.. पानिपत म्हणजे नामुष्की.. पानिपत म्हणजे नाचक्की.. पानिपतम्हणजे मराठी साम्राज्याचा अस्त.. एवढच शिकवल गेल... आणि हो, हे वारंवार घोकून घेतल जायच... पण हे सगळ करताना आम्ही आपल्याइतिहासाचच पानिपत कधी करुन टाकल हे कळलच नाही... पानिपत म्हटले, की मराठी माणसांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त पराभवाचाइतिहास...!

 

पानिपतावरील लढाईने मराठी साम्राज्याला मोठा धक्का बसला असल्याने या भूमिबाबत मराठी माणसांना तसे फारसे प्रेम नाही; पण याच भूमिवर पानिपताच्या लढाईत कित्येक मराठी शूरांनी आपल्या छातीचा कोट करीत जिगरबाज झुंज दिली. पराभवाचा इतिहास विसरून मराठीशूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा इतिहास नव्या पिढीला कळणार कसा. काऱण आपल्याला फक्त विजयाचे पोवाडे ऐकायला आवडते. विजयझाला की सारेच असतात, आणि पराभव झाला की पराभवाला असतो फक्त बाजीराव!

 

दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा,  असं म्हटलं की छाती भरुन येते. पण कधी विचार केलाय का, किती दिवस म्हणायचे रे, ''दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण '' दिल्लीच्या तख्तावरी बैसला महाराष्ट्र'' माझा असं कधी म्हणणार? की ते शिकवायला अब्दाली यायला लागणार का ? असो...

 

पानिपतच्या युद्धासंदर्भात मान्यवरांची मते फार विचारात घेण्यासारखी...

 

१)  "पानिपत हा मराठी मनाचा दुखरा कोपरा आहे. त्यावर फुंकर घालत किती दिवस जगणार? पानिपतच्या पराभवातूनच आजचा भारत उभा आहे ना!पराभवाने पिचणारे मन हे मराठी, किंबहुना भारतीय असूच शकत नाही ", असं न्या. शिरपूरकरानी एके ठिकाणी म्हटलं होत.

 

२)  "तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा संपूर्ण पराभव झाला असता तर पानिपतोत्तर काळात एक प्रभावी सत्ता म्हणून मराठ्यांचा वावर झालानसता", असे प्रतिपादन नागपूरच्या डॉ. यादव गुजर यांनी केले होते.

 

३)  "पानिपतचे युद्ध झाले नसते तर अहमदशाह अब्दाली हा भारताचा शासक झाला असता व जिहादी राजसत्ता व प्रवृत्ती येथे रुजली असती. मात्र, यायुद्धामुळेच भारतात धर्मनिरपेक्षता अबाधित राखली गेली,'' असे विधान प्रा. सदानंद मोरे यानी म्हटलं होत.

 

४)  पानिपतच्या निमीत्तानं शोध घेताना विचारवंताचे हे बोल खरच विचार करायला लावतात... १८५७ चे समर तोंडपाठ पण मग १७६१ चं का सपाट झालयं ?

 

काय झालं होत त्या दिवशी? नेमकं कोणामुळे आपण हरलो? परकीय शत्रूमुळे की स्वकीय फितुरांमुळे? थेट फितूर तर कोणीच नव्हते. पण एकदा कामराठा जिंकला की तो आवरणार नाही. आणि मराठा एकदा जिथं भगवा गाडतो तिथ भगवा उतरवायला आधी वादळवा-याशी सामना करावा लागणारआणि नंतर महाराष्ट्रातील कळीकाळांशी...

 

 

 

पानिपताचा इतिहास या क्षणाला आठवतोय तो असा.

१७६१ च्या मकरसंक्रांतीचा दिवस, संपूर्ण महाराष्ट्र संक्रातीच्या आनंदात होता आणि रणांगणावर प्रत्यक्ष संक्रात कोसळली होती. घरादारातरांगोळ्यांचे सडे पडले होते, तर पानपतावर रक्ताचे सडे. महाराष्ट्रातल्या आयाबहिणीच्या माथ्यावर कुंकू सौभाग्य सजव