www.24taas.com, नवी दिल्ली
राज्यसभेसाठी नामनियुक्त करण्यात आलेल्या रेखाने आज शपथ घेतली. बॉलिवूडची एवरग्रीन अभिनेत्री रेखा मंगळवारी संसदेत पोहोचली आणि सगळ्यांचा नजरा रेखाकडे वळल्या.
दरम्यान, जया बच्चन यांच्या विनंतीनंतर त्यांचा आसन बदलून ९१ वरून १४३ क्रमांकाचं आसन मिळवला आहे. तर रेखाला ९९ क्रमांकाचं आसन मिळाला आहे. त्यामुळे सिलसिला या चित्रपटातील सहकलाकारांचा राज्यसभेत आमना-सामना होण्याची शक्यता मालवली आहे. ५७ वर्षांची अभिनेत्री ७० आणि ८० च्या दशकांमध्ये बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. 'उमराव जान' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ८० च्या दशकानंतरही रेखाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यातही तिच्या कामाचे प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले आहे.
बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना राज्यसभेत ९९ क्रमांकाची जागा देण्यात आली आहे. ही जागा जया बच्चन यांच्या मागे आहे. म्हणजे पुढील रांगेत ९१ आणि मागील रांगेत ९९ अशी आसान व्यवस्था आहे. त्यामुळे जया बच्चन यांनी रेखा यांच्याशी आमना-सामना टाळण्यासाठी आपला आसन क्रमांक ९१ वरून १४३ करून घेतला आहे. ७० च्या दशकात रेखा आणि जया बच्चन यांचे पती अमिताभ बच्चन यांच्या रोमान्सच्या अफवा उठल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा उकरून कोणी काढू नये, यासाठी जया बच्चन यांनी हा बदल करून घेतल्याचे समजते आहे.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="101205"]