गोष्ट कमल-रजनीच्या मैत्रीच्या नात्याची

तमिळ सुपरस्टार कमल हासनने आपला जवळचा मित्र, समकालीन आणि कट्टर प्रतिस्पर्धी रजनीकांतची भरभरून प्रशंसा केली आहे. कमल हासनने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत रजनीकांत सोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा दिला आहे.

Updated: Dec 14, 2011, 02:11 PM IST

झी २४ तास वेब टीम, चेन्नई

 

तमिळ सुपरस्टार कमल हासनने आपला जवळचा मित्र, समकालीन आणि कट्टर प्रतिस्पर्धी रजनीकांतची भरभरून प्रशंसा केली आहे. कमल हासनने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत रजनीकांत सोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा दिला आहे. आणि लवकरच कमल हासन आणि रजनीकांत एका सिनेमात एकत्र काम करणार आहेत. या दोघांनी आता पर्यंत दहा सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. यातल्या बहुतेक हिट झाले असले तरी काही अपयशी सुध्दा ठरले.

 

आम्ही आमचे मेंटॉर के. बालचंदर यांच्या दिग्दर्शनाखाली तीन सिनेमे केल्याचं कमल हासनने सांगितलं. तसंच रजनीच्या काही सिनेमात मी पाहुणा कलाकार म्हणूनही काम केलं असंही तो म्हणाला. मी रजनीला त्याला कोणत्याही गोष्टीला नाही म्हणण्याचा प्रश्नच उदभवत नाही असं कमल हासनने सांगत आपल्या मित्राबद्दल प्रेम व्यक्त केलं. आम्ही दोघांनीही शून्यातुन सुरवात केली. तो बस कंडक्टर होता आणि मी फटमार करणारा क्लॅपर बॉय होतो. पण कलाकार म्हणून आमचे मार्ग एकमेकांमध्ये नेहमीच गुंतत गेले असं कमल हासनने सांगितलं.

 

आयुष्याच्या चढउतारात आम्ही एकमेकांना कायम साथ दिल्याच्या आठवणीही कमल हासनने सांगितल्या. आमच्या कारकिर्दीच्या सुरवातीला एक दिवस आम्ही दोघे एका मोटरसायकलवरुन जात असताना ती घसरली, तेंव्हा रजनीने मला विचारलं की तुला चालवता येते ना? मी त्याला आश्वस्त केलं की मी जरी पडलो तरी त्याला पडू देणार नाही. आणि काही वर्षापूर्वी रजनीने एका कार्यक्रमात सांगितलं की १९८३ साली सिनेमातून निवृत्ती घेऊन सर्व सोडून जाण्याचा विचार केला तेंव्हा कमल हासननेच माझी समजुत घालत सिनेमातच राहण्याचा सल्ला दिला. रजनीच्या उदगारांनी मी भारावून गेल्याचं कमल हासनने सांगितलं. लवकरच आम्ही दोघे एका सिनेमात काम करु असं कमल हासन म्हणाला.