दारा सिंग यांची प्रकृती गंभीर

ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Updated: Jul 8, 2012, 01:27 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

 

अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलेत..CIPD या आजाराने ते त्रस्त आहेत. त्यांना हृदयरोग आहे. दारा सिंग यांचं वय ८३ वर्षं आहे. दारा सिंग यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांचा पुत्र विंधू दारा सिंग याने दिली.दारा सिंग यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ निर्माण झाली आहे. तसंच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती विंधूने दिली.

 

दारा सिंग एक नामांकित पहिलवान आहेत. तसंच अभिनेते म्हणूनही त्यांचं नाव आहे. रामानंद सागर यांच्या रामाणमध्ये त्यांनी केलेली हनुमानाची भूमिका विशेष गाजली होती. २००७ साली प्रदर्शित झालेल्या जब वी मेट या सिनेमातही ते होते. दारा सिंग यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी त्यांच्या फॅन्सनीही हॉस्पिटलबाहेर गर्दी केली.