रणबीर रॉक सुपर स्टार

रॉकस्टार जरी मेगा हिट झाला नसला तरी त्याचे निर्माते इरोस एण्टरटेनमेंट यांनी केलेल्या दाव्यानुसार या सिनेमाने पहिल्या आठवड्यात जगभरात ६४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

Updated: Dec 16, 2011, 01:04 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

रॉकस्टार जरी मेगा हिट झाला नसला तरी त्याचे निर्माते इरोस एण्टरटेनमेंट यांनी केलेल्या दाव्यानुसार या सिनेमाने पहिल्या आठवड्यात जगभरात ६४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. रॉकस्टारच्या दमदार कामगिरीने रणबीर कपूर सितारे आता बूलंदीपर आहेत. रॉकस्टारला मिळालेल्या प्रशंसेनेने रणबीर कपूरने आता आपलं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीर आता पुढच्या प्रोजेक्टससाठी आपली फी भरपूर प्रमाणात वाढवेल अशीच चिन्हं आहेत.

 

सध्या अनुराग बसूच्या ‘बर्फी’साठी आणि अयान मुखर्जीच्या ‘ये जवानी है दिवानी’ साठी रणबीरने आठ कोटी रुपये घेतले आहेत. आता पुढच्या सिनेमांसाठी रणबीरने त्यात दुप्पटीने वाढ करुन १५ कोटी रुपये मागण्यास सुरवात केली आहे. रॉकस्टार जरी प्रेक्षकांच्या एका वर्गाला आवडला नसला तरी रणबीरचा परफॉर्मन्सवर फिदा झालेलाही मोठा प्रेक्षक वर्ग आहे. सिनेमाच्या व्यवसायातील एका जाणकाराच्या मते रणबीरने मानधन वाढवणं योग्य असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार रॉकस्टारच्या यशाने रणबीर सुपरस्टारपदी आरूढ झाला आहे.