www.24taas.com, मुंबई
'बिग बॉस ५' मधून सनी लिऑन भारतीय लोकांच्या घराघरात पोहोचली. ही भारतीय वंशाची कॅनेडियन पॉर्न अभिनेत्री नक्की कोण हे, हा प्रश्न सगळ्यांना पडला होता.
सनीच्या एकुण उद्योगांवरून ही भारतीय नसणारच, असाही काही जणांचा होरा होता. मात्र, खुद्द सनी लिऑन हिने स्वतःच आता आपलं खरं नाव जगजाहीर केलं आहे. सनी लिऑनचं खरं नाव करेनजीत कौर व्होरा आहे. जगभरातल्या प्रेक्षकांना सोप्पं जावं, म्हणून बाईसाहेबांनी करेनजीत कौरचं सनी लिऑन करून टाकलं.
आता तिने सनी लिऑन हे नाव कुठून शोधून काढलं, तर पंजाबीतलंच नाव तिने इंग्रजीत बदललं असल्याचं सांगण्यात येत आहे. कौरचा इंग्रजीत अर्थ लिऑनेस (सिंहीण) होतो आणि तोच शब्द लहान करुन लिऑन होतो. आता करेनजीत कौर असो नाही तर सनी लिऑन, शेवटी नावात काय आहे, नाही का?