सलमान होणार राखीचा गॉडफादर

श्वास रोखून धरायला लावणारी बातमी आता तुम्ही वाचणार आहात. बॉलिवूडमध्ये आपलं स्वत:चा ‘विशेष’ असं स्थान निर्माण करणारी ‘अभिनय संपन्न’ अदाकारा राखी सावंत हिने आता चक्का सलमान खानला आपलं गॉडफादर होण्यासाठी गळ घातली आहे. आता हे ऐकल्यानंतर बॉलिवूडमध्ये फक्त त्सूनामी यायची बाकी राहिली आहे. बिग बॉस 5 च्या ग्रँड फिनालेमध्ये राखीने आपल्या परफॉर्मन्सचे जलवे दाखवले त्यानंतर तिने सल्लूमियाला गाठलं.

Updated: Jan 9, 2012, 09:46 AM IST


www.24taas.com, मुंबई 

 

श्वास रोखून धरायला लावणारी बातमी आता तुम्ही वाचणार आहात. बॉलिवूडमध्ये आपलं स्वत:चा ‘विशेष’ असं स्थान निर्माण करणारी ‘अभिनय संपन्न’ अदाकारा राखी सावंत हिने आता चक्क सलमान खानला आपलं गॉडफादर होण्यासाठी गळ घातली आहे. आता हे ऐकल्यानंतर बॉलिवूडमध्ये फक्त त्सूनामी यायची बाकी राहिली आहे. बिग बॉस 5 च्या ग्रँड फिनालेमध्ये राखीने आपल्या परफॉर्मन्सचे जलवे दाखवले त्यानंतर तिने सल्लूमियाला गाठलं.

 

राखीने आपल्या खास शैलीत सलमानला आपला गॉडफादर होण्यासाठी गळ घातली. यावर राखीजी काय म्हणाल्या ते आपण पाहू या मी सलमान सांगितलं कि कतरिना कैफ, झरीन खान, स्नेहा उलाल यासारख्या अभिनेत्रींचे करिअर तू लँच केलेस, त्यामुळे मीही हटून बसले कि मलाही एक संधी मिळावी. आता त्याने त्याच्या एका सिनेमात एका आयटम साँगसाठी घेण्याचं वचन दिलं आहे. आणि मला आशा आहे की सलमान दिलेला शब्द पाळेल, इति राखी...

 

आता एवढ्यावर गप्प बसेल ती राखी कसली. राखी म्हणते की तिला चिकनी चमेलीत कतरिनाचा परफॉर्मन्स आवडला. पण मी तिच्या पेक्षा चांगल्या प्रकारे आयटन नंबर सादर करुन दाखवला असता कारण मी ओरिजिनल आयटम गर्ल आहे. हे तर काहीच नाही यापुढे तिचं म्हणणं असं आहे की आजकाल अनेकांना सिनेमा मिळत नसल्यामुळे त्या आयटम साँगवर परफॉर्म करतात. धन्य आहे राखीची.

 

राखी बिग बॉसच्या पहिल्या सीझन मध्ये होती त्यामुळे तिचं म्हणणं असं की आमच्या वेळेस जे होतं ते ओरिजिनल होतं. आम्हाला कॅमेरा आणि पब्लिसिटी बाबत फारशी कल्पना नव्हती. पण आता आधीच्या सीझनचे एपिसोड पाहून करणं अधिक सोपं झालं आहे. म्हणजे एकूण काय राखी करते ते ओरिजिनल असतं बाकीचे करतात ते अनुकरण असतं.