बिहारच्या सुशीलकुमारने 'केबीसी'त जिंकले ५ कोटी

या वेळच्या पाचव्या सीझनमध्ये ५ कोटीची घसघशीत रक्कम जिंकली ती बिहारच्या सुशील कुमार याने. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्‍ये आतापर्यंत कोणालाही ५ कोटी रुपये जिंकता आले नाही. सुशील कुमार हा ६ हजार रुपये वेतनावर संगणक ऑपरेटरचे काम करतो.

Updated: Oct 25, 2011, 03:03 PM IST

 झी २४ तास वेब टीम, मुंबई

कौन बनेगा करोडपतीमध्ये १ कोटी जिंकणारा पहिला विजेता होता मुंबईचाच हर्षवर्धन नवाथे. यानंतर केबीसीचे वेगवेगळे ३ सीझन  झाले, धनराशीत वाढ करण्यात आली.झारखंडच्‍या तस्‍लीम हिने एक कोटी रुपये जिंकले होते. परंतु, 5 कोटी रुपयांसाठी विचारलेल्‍या प्रश्‍नाचे तिला बरोबर उत्तर देता आले नव्‍हते. त्‍यामुळे तिला 3 लाख 20 हजारांवरच समाधान मानावे लागले होते.  पण, हर्षवर्धनसारखं १ कोटी जिंकणं कुठल्याही एका स्पर्धकाला जमलं नाही. मात्र, या वेळच्या पाचव्या सीझनमध्ये ५ कोटीची घसघशीत रक्कम जिंकली ती बिहारच्या सुशील कुमार याने.   यंदाची दिवाळी दरमहा ६ हजार रुपये वेतन घेणा-या या बिहारी बाबूसाठी खास ठरली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्‍ये बिहारच्‍या सुशील कुमार नावाच्‍या तरुणाने ५ कोटी रुपये जिंकून इतिहास रचला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्‍ये आतापर्यंत कोणालाही ५ कोटी रुपये जिंकता आले नाही. सुशील कुमार हा ६ हजार रुपये वेतनावर संगणक ऑपरेटरचे काम करतो. घरखर्च चालविण्‍यासाठी तो शिकवणी वर्गही घेतो.

या शोचे प्रसारण २ नोव्‍हेंबर रोजी सोनी टीव्‍हीवर होणार आहे.  त्‍यामुळे सुशील कुमार हा केबीसीमध्‍ये पुरस्‍काराची सर्वाधिक रक्‍कम जिंकणारा ठरला आहे.