उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या यशाचे शिलेदार ठरलेले अखिलेश यादव सर्वात तरुण मुख्यमंत्री झालेत. सपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यात अखिलेशच्य़ा नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
आझम खान यांनी अखिलेश यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला शिवपाल यादव यांनी समर्थन दिलं. ३८ व्या वर्षी अखिलेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत. लखनऊमध्ये सपाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये आझम खान यांनी मुख्यमंत्रीपदाच्या नावासाठी अखिलेश यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात पसंती दिली.
३८ वर्षीय अखिलेश यादवना देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्रीपदाचा मान मिळणार आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव हेही या बैठकीत उपस्थित होते.