ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची दिल्लीपासून राळेगणपर्यंत नेहमीच पाठराखण करत आलेले अभिनेते ओम पुरी यांनीच आता अण्णांना उघडे पाडले आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हे समर्थनीय असले तरी अण्णा हे अनपढ, दिशाहीन आणि बाहुले आहेत, असे त्यांनी आज येथे सांगितले.
अण्णांच्या व्यासपीठावरून ओम पुरी यांनी याआधी लोकशाहीची खिल्ली उडवतानाच राजकीय नेत्यांना अनपढ, गवार म्हटले होते. आता मात्र पुरी यांनी हजारे हे कमी शिकलेले असून आंदोलनाला दिशा देण्यास असमर्थ असल्याची जोरदार टीका केली आहे.
हजारे यांनी आपल्याभोवतीच्या चौकडीतून बाहेर पडून उच्चशिक्षित लोकांचीही मदत घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.