www.24taas.com, मुंबई
जगभरातील भारतीयांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आता अनिवासी भारतीयांना देशातील निवडणूक प्रक्रियेत सहभाग तसंच मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सार्वत्रित निवडणुकांमध्ये अनिवासी भारतीयांना मतदान करता यावं यासाठी कायदा पारित करण्यात आला. आणि त्या अंतर्गत परदेशातील भारतीय मतदारांच्या नोंदणीसाठी निर्देश जारी करण्यात आल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं.
परदेशात असलेल्या भारतीयांना निवडणुक प्रक्रियेत सहभागी होता यावं यासाठी हे पहिलं महत्वपूर्ण पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांच्या वार्षिक संमेलनाला संबोधित करताना सांगितलं. अनिवासी भारतीय बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिकेचं महत्व आणि मुल्य सरकार आणि देशवासीय ओळखतात. तसंच आधुनिक भारताच्या निर्मितीत अनिवासी भारतीय मोलाचं योगदान देतील याविषयीही त्यांना विश्वास असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी १० व्या प्रवासी भारतीय दिवसाचे उदघाटन केलं.