आजचा सेंसेक्स

मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 151 अंशांवर बंद झाला. त्यात 56 अंशांची घट झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज 5 हजार 202 अंशांवर बंद झाला. त्यात 20 अंशांची घट झाली. आज सकाळी शेअरबाजार खुला होताना घट पहायला मिळाली.

Updated: Apr 25, 2012, 05:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 151 अंशांवर बंद झाला. त्यात 56 अंशांची घट झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज 5 हजार 202 अंशांवर बंद झाला. त्यात 20 अंशांची घट झाली. आज सकाळी शेअरबाजार खुला होताना घट पहायला मिळाली. मात्र, त्यानंतरच्या सकाळच्या सत्रात बाजारात सकारात्मक बदल पहायला मिळाला. ग्लोबल क्रेडीट एजंसी, एस एण्ड पीनं भारताचं रेटींग स्थिर पातळीवरुन नकारात्मक नोंदवलं आणि त्यामुळे भारतातील गुंतवणूकीचा वेग कमी होऊन आर्थिक विकासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली.

 

एस एण्ड पीच्या निष्कर्षामुळे दुपारी शेअरबाजार कोसळला, पण काही वेळातच बाजार पुन्हा सावरू लागला, पण शेवटी बाजार घटीच्या पातळीवरच बंद झाला. डिझेलच्या दरावरचं नियंत्रण हटवण्याचं सरकारनं तत्त्वत: मान्य केल्यामुळे, सार्वजनिक क्षेत्रातल्या ऑईल मार्केटींग कंपनीचे स्टॉक्स आज सलग दुस-या दिवशी तेजीत होते.

 

पावसाचे आगमन वेळेवर होणार असल्याच्या वृत्तामुळे ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांचे स्टॉक्सही वधारलेत. साखर निर्यातीवर चर्चा करण्यासाठी होत असलेल्या मंत्रीगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या स्टॉक्समध्येही तेजी होती. व्याजदराबाबत संवेदनशील असणारे एटो स्टॉक्स संमिश्र होते तर रियॅलिटी स्टॉक्समध्ये मंदी होती. आज भारती एअऱटेल, हिरो मोटोकॉर्प, स्टर्लाईट इंडिया, मारूती सुझुकी, एचडीएफसी बॅंक या टॉप पाच कंपन्या तेजीत होत्या तर विप्रो, गेल, भेल, टीसीएस, कोल इंडिया या टॉप पाच कंपन्या मंदीत होत्या