माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांची विनंती दिल्ली कोर्टाने फेटाळली आहे. न्यायालयात 2 G टू जी स्पेक्ट्रम खटल्याच्या सूनावणीला सुरवात झाली आहे आणि सीबीआयचा तपास पूर्ण होई पर्यंत साक्षीदारांची उलटतपासणी घेणार नसल्याच्या संदर्भात ए.राजा यांनी ही विनंती केली.
विशेष न्यायाधीश ओ.पी.साहनी यांनी खटल्याच्या सूनावणी सुरू करण्याच्या काही मिनिटे अगोदर राजा यांनी ही विनंती केली. खटल्यातील पहिले साक्षीदार रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे उपाध्यक्ष आनंद सुब्रमणियम यांची साक्ष नोंदवणं सुरु होण्यापूर्वी राजा यांनी ही विनंती केली.
टू जी स्पेक्ट्रम प्रकरणी २१ ऑक्टोबर २००९ पासून सुरु झालेला तपास पूर्ण झाला आणि सीआरपीसीच्या कलम २४४ अन्वये सर्व जबाब अर्जदाराला दिल्यानंतर साक्षीदारांच्या उलटतपासणीचा हक्क वापरु अशी विनंती अर्जाद्वारे राजा यांनी कोर्टाला केली.
राजा यांचे वकिल यांनी कोर्टाने सीबीआयला सर्व १७ आरोपींची चौकशी पूर्ण झाली आहे का यासंबंधी विचारणा करावी असं आपलं म्हणणं मांडले. सीबीआयने दाखल केलेल्या एका एफआयआरच्या आधारेच तपास चालु असल्याचं राजा यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. पण कोर्टाने राजा यांची विनंती फेटाळत पहिल्या साक्षीदाराचा जबाब नोंदवायला सुरवात केली.