किंग ऑफ बॅड टाईम्स

किंगफिशर एअरलाईन्सचा संचित तोटयाने तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळेच नागरी उड्डाण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला आर्थिक आरिष्टात सापडलेल्या किंग फिशरला सहाय्या करावे अशी विनंती करावी लागली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला एटीएफ म्हणजे एविएशन टरबाईन फ्युल टॅक्सेसमध्ये कपात करावी अशी विनंती केली.

Updated: Nov 11, 2011, 03:13 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

विजय मल्या म्हटलं की अनेकांना आठवते किंग ऑफ द गुड टाईम्स ही टॅगलाईन...आणि अनेकांना घायाळ करणारे किंगफिशर कँलेडर. विजय मल्याच्या लाईफस्टाईलचा अनेकांना हेवा वाटतो तो काही उगाचच नव्हे. पण लहानपणी आपण ऐकलेल्या राजा आणि माकडाच्या गोष्टीत माकड जसं राजा भिकारी माझी टोपी चोरली अशी थट्टा करतो तशी अवस्था मल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सची झाली आहे.

किंगफिशर एअरलाईन्सचा संचित तोटयाने तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळेच नागरी उड्डाण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला आर्थिक आरिष्टात सापडलेल्या किंग फिशरला सहाय्या करावे अशी विनंती करावी लागली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला एटीएफ म्हणजे एविएशन टरबाईन फ्युल टॅक्सेसमध्ये कपात करावी अशी विनंती केली.

काही वृत्तांनुसार अर्थमंत्री प्रणब मुखर्जी बँकांनी किंगफिशला कर्ज द्यावं यासाठी शब्द टाकणार आहेत. एअर इंडायप्रमाणे जरी किंगफिशरला पॅकेज देता येणार नसलं तरी तेल खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी अधिक मुदत द्यावी यासाठी सरकार तेल कंपन्यायंना सूचना करण्याची शक्यता आहे. नागरी उड्डाण मंत्रालय राज्य सरकारने कमी कर आकारावा यासाठी बोलणी करणार असल्याचंही कळतं.

किंगफिशरच्या अडचणी वाढल्याने कालच्या दिवसात तब्बल ३० उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. गेल्या काही दिवसात जवळपास शंभरहून अधिक पायलटनी राजीनामे दिले आहेत. किंगफिशरला भांडवल किंवा कर्ज उभारता न आल्याने इंधन खरेदीसाठी पैसेही शिल्लक राहिलेले नाहीत.