ओडिशात माओवाद्यांकडून आमदाराचे अपहरण

ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाच्या आमदाराचे माओवाद्यांनी आज अपहरण केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुन्हा माओवाद्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. याआधी परदेशी पर्यटकांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले आहे.

Updated: Mar 24, 2012, 10:58 AM IST

www.24taas.com,  कोरापूत

ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाच्या आमदाराचे माओवाद्यांनी आज  अपहरण केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुन्हा माओवाद्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. याआधी परदेशी पर्यटकांचे नक्षलवाद्यांनी  अपहरण केले आहे.

लक्ष्मीपूर मतदार संघातील आमदार जिन्हा हिकाका यांचे अपहरण करण्यात आले आहे. कोरापूत येथून घरी परत येत असताना सुमारे ५०माओवाद्यांनी टोयापूतजवळ त्यांचे वाहन थांबविले. हिकाका यांचा सुरक्षा रक्षक आणि चालकाला माओवाद्यांनी जाऊ दिले, अशी माहिती  पोलीस आयुक्त अविनाश कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान, माओवादी हिकाका यांना जवळच्या जंगलात घेऊन गेल्याचे समजते. सुरक्षा रक्षक आणि चालकांनी लक्ष्मीपूर पोलिस ठाण्यात जाऊन अपहरणाची माहिती दिली. हिकाका यांना शोधण्यासाठी व्यापक शोधमोहीम उघडण्यात आली आहे.१४  मार्चला कंधमाल जिल्ह्यातून इटालियन पर्यटकांचे अपहरण केल्याच्या घटनेला अवघे दहा दिवस झाले असताना एका आमदाराचे माओवाद्यांनी अपहरण केल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.