काँग्रेस थंड, राष्ट्रवादी अस्वस्थ

शरद पवारांची नाराजी अजूनही कायम आहे. मात्र पवारांच्या नाराजीबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी थंड प्रतिसाद दिल्याने, राष्ट्रवादीतील अस्वस्थता वाढीस लागली आहे.

Updated: Jul 24, 2012, 09:46 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

शरद पवारांची नाराजी अजूनही कायम आहे. मात्र पवारांच्या नाराजीबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी थंड प्रतिसाद दिल्याने, राष्ट्रवादीतील अस्वस्थता वाढीस लागली आहे.

काँग्रेसच्या निर्णयाची राष्ट्रवादी आणखी दोन दिवस वाट पाहणार आहे. अन्यथा गुरुवारी कॅबिनेट बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. वेळ पडल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचीही राष्ट्रवादीची तयारी आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीतला समन्वय समितीच्या बैठकीचा तिढा मिटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. काँग्रेसनं पाठवलेल्या समन्वय समितीच्या बैठकीच्या पत्राला राष्ट्रवादीनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. बैठकीला येण्याची तयारी दर्शवून वेळ आणि तारीख कळवावी असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय.