'किंग' मल्ल्या दिवाळखोरीत, घरांचा लिलाव

किंगफिशरचे सर्वेसर्वा विजय मल्‍ल्‍यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. एअरलाईन्सचे किंग म्हणून ओळखलेले जाणारे मल्ल्या दिवाळखोरीत आलेत. हे संकट एअरलाईन्समुळे ओढवले आहे. दिवाळखोरीतून बाहेर पडण्यासाठी मल्ल्यांना चक्क घरांचा लिलाव करावा लागण्याची वेळ आली आहे.

Updated: Jul 5, 2012, 06:39 PM IST

www.24taas.com, मुंबई

किंगफिशरचे सर्वेसर्वा विजय मल्‍ल्‍यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. एअरलाईन्सचे किंग म्हणून ओळखलेले जाणारे मल्ल्या दिवाळखोरीत आलेत. हे संकट एअरलाईन्समुळे ओढवले आहे. दिवाळखोरीतून  बाहेर पडण्यासाठी मल्ल्यांना चक्क घरांचा लिलाव करावा लागण्याची वेळ आली आहे.

किंगफिशर एअरलाईन्‍सला कर्ज देणा-या समूहांनी गुरूवारी मॉर्गेज फर्म एचडीएफसीला एअरलाईन्‍सच्‍या या दोन्‍ही संपत्‍तीचे मूल्‍यांकन करण्‍यास सांगितले आहे. कर्ज दिलेले समूह मुंबई आणि गोवा येथील घरांची विक्री करून काही प्रमाणात कर्ज वसूल करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मल्ल्यांना दोन्ही घरांचा लिलाव करण्यात येणार असल्याने त्यांच्यासमोरील अडचणी संपण्‍याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एअरइंडियाच्या कर्मचाऱ्यांचा ५७ दिवसांनी संप मिटला. तरी एअरलाईन्‍स क्षेत्रातील नुकसानीमुळे मल्‍ल्‍यांची घरं लिलावात काढण्यात आली आहे.

दिवाळखोरीत निघालेल्‍या किंगफिशर एअरलाईन्‍सला कर्ज दिलेल्‍या बँकांनी कर्ज वसूलीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्‍यामुळे मल्‍ल्‍यांचे मुंबई येथील 'किंगफिशर हाऊस'  आणि गोव्‍यातील एक व्हिला विकण्‍यात येणार आहे. दरम्यान, कर्जात बुडालेल्‍या किंगफिशर एअरलाईन्‍सने कर्ज वसुलीसाठी सुरू झालेल्‍या प्रक्रियेचा इन्‍कार केला आहे.