कौन बनेगा राष्ट्रपती?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तयारीला आता वेग येऊ लागला आहे. केंद्रातल्या युपीए आणि एनडीएत राष्ट्रपतीपदावरून चांगलीच चुरस निर्माण झालीय. त्यातच आज संसद भवनात लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव आणि शरद यादव या तीन यादवांमध्ये सुमारे वीस मिनीटं चर्चा झाली.

Updated: May 4, 2012, 07:04 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तयारीला आता वेग येऊ लागला आहे. केंद्रातल्या युपीए आणि एनडीएत राष्ट्रपतीपदावरून चांगलीच चुरस निर्माण झालीय. त्यातच आज संसद भवनात लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव आणि शरद यादव या तीन यादवांमध्ये सुमारे वीस मिनीटं चर्चा झाली.

 

अर्थात त्यांच्या चर्चेत मुख्य विषय हा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असणार ? हाच मुख्य मुद्दा होता. त्यातच डाव्या पक्षांचीही आज बैठक होतेय. परिणामी आता राजधानीतलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरूवात झालीय.

 

पुढचा राष्ट्रपती कोण ? दिल्लीत राजकीय चर्चेला वेग आला असताना पुढचा राष्ट्रपती आदिवासी हवा अशी मागणी करत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पी. ए. संगमांनी नव्या चर्चेला तोंड फोडलंय....

 

दिल्लीत 9 मे रोजी आदिवासी मेळावा होणार असून त्यात आदिवासी नेत्याला राष्ट्रपतीपद मिळावं म्हणून मागणी केली जाणार आहे, असं संगमा यांनी सांगितलं....तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र राष्ट्रवादीची भूमिका अद्याप ठरली नसल्याचं स्पष्ट केलंय.

 

आधी सर्वसंमतींनं उमेदवार ठरवावा अशी भूमिका मांडणा-या पवारांनी याबाबत अधिकृत नाव समोर आल्यावर प्रतिक्रिया देऊ, असं सांगत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली....तर राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसकडून नेमकं कोणतं नाव समोर येतं, त्यानंतरच भाजप आपली भूमिका ठरवेल, असं मत भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलंय.

 

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते पी. ए. संगमा यांनी आदिवासी राष्ट्रपती व्हावा अशी मागणी केली असली तरी त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र राष्ट्रवादीची भूमिका अद्याप ठरली नसल्याचं स्पष्ट केलंय.... आधी सर्वसंमतींनं उमेदवार ठरवावा अशी भूमिका मांडणा-या पवारांनी याबाबत अधिकृत नाव समोर आल्यावर प्रतिक्रिया देऊ, असं सांगत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली....

Tags: