www.24taas.com, सिंगूर
सिंगूर प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारला जोरदार झटका बसलाय. सिंगूर कायदा घटनाविरोधी असल्याचा निर्णय कलकत्ता हायकोर्टानं दिला.
या निर्णयामुळं टाटा मोटर्सचा विजय झालाय. दुसरीकडे या निर्णयानंतर अपीलासाठी पश्चिम बंगाल सरकारने कोर्टाला 2 महिन्यांचा वेळ दिलाय. पश्चिम बंगाल सरकार हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. 22 जून 2011 रोजी ममता बॅनर्जी सरकारनं सिंगूर कायदा पास केला होता.
या कायद्यानुसार ४०० एकर शेतजमिनी शेतक-यांना परत देण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवाय 600 एकर शेतजमीन जशीच्या तशी ठेवण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. या कायद्याला टाटा मोटर्सने कलकत्ता हायकोर्टात आव्हान दिलं होतं. नॅनो प्लांट संदर्भात हा सिंगूर एक्ट करण्यात आला होता.